मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानली जाणारी बीसीसआय देखील आर्थिक संकटात सापडली आहे. दरम्यान माजी यष्टीरक्षक आणि बीसीसीआयचे महानिर्देशक सबा करीब यांची नोकरी देखील धोक्यात आली आहे. बीसीसीआयच्या मते, सबा करीम आपले जास्त योगदान देत नाही.
बीसीसीआयचे एक अधिकारी म्हणाले की, “आम्ही खूप अडचणीत आहेत. त्यामुळे काहीतरी वेगळे विचार करणे गरजेचे आहे. यासाठी काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील. या परिस्थितीतून सावरण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहोत. बीसीसीआयच्या कामात सबा करीम चांगले योगदान देत नाही. त्यासोबतच काही राज्यातील क्रिकेट संघटनेसोबत त्यांचे संबंध चांगले नाहीत.
ते म्हणाले की, “राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची सर्वस्व जबाबदारी राहुल द्रविड आणि केव्हीपी राव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी आधीच सबा करीम यांच्याकडे होती. पंच अकादमीची जबाबदारी सबा करीम यांच्यावर होती जी आता संपल्यात जमा आहे. काही लोकांवर दुहेरी जबाबदारी आहे. ते प्रामाणिक पणे पार पडत आहेत. मात्र, ज्यांच्याकडे कमी जबाबदाऱ्या असूनही त्या पार पाडत नाहीत. त्यांच्या बाबतीत आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल.”
क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांनी अधिक कडक निर्णय घेतले आहेत. चांगलं काम करण्याचा दबाव आमच्यावरही आहे. लोकांनी आमच्या पगारा ऐवजी आमच्या कामांवर चर्चा करावी असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
“सबा करीम यांच्याविरोधात महिला क्रिकेट संघ, संपूर्ण स्टाफ आणि महिला निवड समितीच्या सदस्यांनी त्यांच्या कामाविषयी तक्रार केली आहे. आम्ही समजू शकतो की ते यापूर्वी निवड समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहेत. आता ते निवड समितीमध्ये नाहीत. त्यामुळे करीम यांनी निवड समितीमध्ये हस्तक्षेप करू नये”
“करीम यांनी बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याची तक्रारही काही जणांनी केली आहे. त्यांच्या नियुक्तीवरही अनेकजणांनी आक्षेप घेतला आहे. महानिर्देशक पदावर बसण्यासाठी तशी पदवी असणे आवश्यक आहे. मात्र, ती त्यांच्याकडे नाही असे अनेक प्रश्न त्यांच्या विषयी विचारले जात आहेत. त्यांना या पदावर बसविण्यासाठी अनेकांनी नियमांची छेडछाड केली आहे,” असेही अधिकारीने म्हटले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
लॉकडाऊनमुळे बदलणार टीम इंडियाची जर्सी, १४ वर्षात पहिल्यांदाच होणार ही नकोशी गोष्ट
रोहितचा सराव करणं या लोकांना आवडलं नाही, राज्य सरकारला केली अपिल
पुजारा विरुद्ध भारतीय संघात रचला जातो कट, संघाबाहेर असलेल्या खेळाडूने केला खुलासा