पुणे। एसेस टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एनरझरलचे निखिल राव प्रायोजित पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पीएमडीटीए एसेस करंडक पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत सचिन देसरडा, अमित किंडो, सुर्यप्रताप निंबाळकर, राहुल कोठारी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
एसेस टेनिस अकादमी, उंड्री या ठिकाणी आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत पुरुष एकेरीत सचिन देसरडा याने सातव्या मानांकित वरुण जाधवचा 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अव्वल मानांकित सुर्यप्रताप निंबाळकरने पंकज बोरीकरचा 6-3 असा तर, तिसऱ्या मानांकित अभिषेक चव्हाणने नरेंद्र पवारचा 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी: पुरुष:
सुर्यप्रताप निंबाळकर[1] वि.वि.पंकज बोरीकर 6-3;
अमित किंडो[5] वि.वि.पार्थ मोहापात्रा 6-2;
सचिन देसरडा वि.वि.वरुण जाधव[7] 6-3;
राहुल कोठारी[4] वि.वि.निखिल भगत 6-0;
अभिषेक चव्हाण[3] वि.वि.नरेंद्र पवार 6-2;
रवी कोठारी[6]वि.वि.समीर मंसुरी 6-4;
अमन रथाईथ[8]वि.वि.रोहन नाईक 7-6(7-4);
रतीश रितूसरिया वि.वि.विकास चौधरी 6-3.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या, पण…’ अनेक विक्रम तोडूनही बटलर ‘या’ कारणाने निराश
IPL 2022मध्ये सगळ्यात जास्त धावा करूनही बटलर निराश, अंतिम सामन्यात फेकून दिले हेल्मेट, पाहा Video
कहर योगायोग! नऊ वर्षांपूर्वी चेन्नईबरोबर आणि आता राजस्थानबरोबर घडली सारखीच गोष्ट