---Advertisement---

…आणि सचिनला अमिताभ बच्चन यांच्यासमोर व्हावे लागले होते खजील, वाचा ‘तो’ मजेदार किस्सा

On: सोमवार, एप्रिल 24, 2023 11:11 AM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज (24 एप्रिल) त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. यावर्षी सचिन तेंडुलकर हा खास दिवस आपल्या कुटुंबासमवेत साजरा करणार आहे. सचिनने मागच्या वर्षी कोरोना विषाणू विरूद्धचे युद्ध जिंकले. त्याचवेळी, सचिनने आपला मुलगा अर्जुन व जगप्रसिद्ध सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा तब्बल 19 वर्ष जुना किस्सा सर्वांना सांगितला होता. त्यावेळी मला खूप खजील व्हावे लागले होते, असे सचिनने म्हटलेले.

अशी घडली होती घटना
शतकातील सर्वात्तम अभिनेते म्हणून ओळखले जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या वेळी सचिनने सर्वांसमक्ष आपला मुलगा अर्जुन व अमिताभ बच्चन यांच्या दरम्यानचा एक खुमासदार किस्सा सर्वांना सांगितला होता. सचिनने सांगितले, “एकदा अमितजी आणि मी एका जाहिरातीचे शूट करत होतो. त्यावेळी मी अर्जुनला सोबत नेले होते. अर्जुन तेव्हा दीड वर्षाचा असेल.अर्जुन माझ्या मांडीवर बसून संत्री खात होता. संत्री खाऊन झाल्यावर त्याने आपले हात अमितजींच्या सदर्‍याला पुसले. मला समजेना मी काय करू. मी खूप खजील झालो होतो. मात्र, अमितजींना या गोष्टीचे काही वाटले नाही आणि ते आपल्या नातवाप्रमाणे त्याच्याशी खेळत राहिले.”

आता अर्जुन 23 वर्षाचा झाला असून वडिलांप्रमाणे क्रिकेटमध्ये त्याने कारकीर्द सुरू केली आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2023 मध्ये तो मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण केले असून, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई आणि गोवा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सचिन आणि अमिताभ यांच्या कुटुंबांमध्ये अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. दोन्ही कुटुंब काही महत्त्वाच्यावेळी एकत्र देखील येतात.

दोघांनी केले होते एकमेकांचे कौतुक
मुंबई पोलिसांतर्फे आयोजित होणाऱ्या उमंग सोहळ्यात सचिनने अमिताभ यांचे कौतुक केले होते. सन 2010 मध्ये सचिने डॉन ब्रॅडमन यांचे विक्रम तोडल्यानंतर या दोघांची तुलना केली जाऊ लागली होती. त्यावर अमिताभ यांनी कठोर शब्दात दोघांच्या तुलनेची गरज नसल्याचे म्हटले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
सचिन वाढदिवस विशेष लेख –
सचिन ९२वर खेळतोय रे…!!
सतत ऑस्ट्रेलियाला नडणारा मास्टर ब्लास्टर…
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सचिन सचिनसारखाच खेळला
वाढदिवस विशेष: सचिन- क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…
खास आठवण, सचिनचा २०० वा कसोटी सामना आणि मान्यवरांचे ट्विट्स…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---