---Advertisement---

निवृत्तीनंतर श्रीसंतला मास्टरच्या शुभेच्छा; इंस्टाग्राम पोस्ट करत लिहीले ‘खास’ शब्द

On: रविवार, मार्च 13, 2022 9:47 PM
0 sachin sreesanth
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने वयाच्या ३९ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व प्रकारांमधून श्रीसंतने निवृत्तीची घोषणा केली. तो नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला होता. त्याच्या निवृत्तीनंतर भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने त्याला निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या शुभेच्छा दिल्या.

सचिनच्या खास शुभेच्छा

सचिनने आपला व श्रीसंतचा एक कसोटी क्रिकेटमधील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. त्यामध्ये शुभेच्छा देताना सचिन लिहिले,

https://www.instagram.com/p/CbAtjqNvAqG/?utm_medium=copy_link

‘खूप कौशल्य असलेला एक टॅलेंटेड गोलंदाज म्हणून तुला नेहमीच लक्षात ठेवले जाईल. अनेक वर्ष भारतीय संघासाठी खेळल्या बद्दल तुझे अभिनंदन. आयुष्याच्या दुसऱ्या खेळीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा.’

श्रीसंत याने युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी आपण निवृत्त होत असल्याचे म्हटले होते. त्याने नुकतेच तब्बल ९ वर्षानंतर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. आयपीएल २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सापडल्यानंतर त्याच्यावर ७ वर्ष बंदीची कारवाई करण्यात आली होती. यानंतर तो या प्रकरणात निर्दोष सिद्ध झाला.

अप्रतिम राहिली कारकीर्द

श्रीसंतने २००५ ते २०११ या कालावधीत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. भारताने जिंकलेल्या २००७ टी२० विश्वचषक व २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचा तो सदस्य होता. श्रीसंतने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ४४ सामने खेळताना ४० बळी मिळवले. आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब, कोची टस्कर्स केरला व राजस्थान रॉयल्स या संघांचे त्याने प्रतिनिधित्व केले. सध्या सुरू असलेल्या २०२२ रणजी हंगामात तो केरळ संघासाठी आपला अखेरचा प्रथमश्रेणी सामना खेळला‌.‌ या सामन्यात त्याला दोन बळी मिळविण्यात यश आले होते. त्यानंतर दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर झाला होता. नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती.

महत्वाच्या बातम्या-

‘मी नेतृत्व करताना कधीही विराट कोहली बनणार नाही, पण एमएस धोनी…’, फाफ डू प्लेसिसचं मोठं वक्तव्य (mahasports.in)

धक्कादायक! रोहित शर्माने मारलेल्या षटकाराने प्रेक्षकाचे नाक फ्रॅक्चर, डॉक्टर म्हणाले… (mahasports.in)

बंगळुरूत घोंगावलं पंत नावाचं वादळ! मोडलाय थेट ४० वर्षांपूर्वीचा विक्रम (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---