---Advertisement---

‘त्यामुळे’ सचिन सेहवागला नेहमी चारायचा केळी, खास दिवशी विरूने दिला जुन्या आठवणीला उजाळा

On: सोमवार, एप्रिल 25, 2022 5:22 PM
sachin-sehwag
---Advertisement---

‘क्रिकेटचा देव’ म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने रविवारी (२४ एप्रिल) त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियाच्या माध्यमांतून अनेक दिग्गजांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सचिनने त्याच्या २४ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विक्रम बनवले, जे आजही कायम आहेत. माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने देखील सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत, पण यावेळी त्याने ड्रेसिंग रूममधील एक जुना किस्सा सर्वांसोबत शेअर केला आहे.

विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओत सेहवाग केळी खाताना दिसत आहे. ड्रेसिंग रुममधील जुना किस्सा सांगताना सेहवाग म्हणाला की, “सचिनची माझ्याकडून सर्वात मोठी अपेक्षा हीच असायची की, मी धावा करो अगर न करो, पण ड्रेसिंग रूममध्ये सामना पाहताना शांत नक्कीच बसावे. तो मला शांत बसवण्यासाठी नेहमीच केळी खाऊ घालायचा. असे यामुळे की, जर मी केळी खाल्ली, तर बोलता येणार नाही. तर आज सचिन पाजीच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्याकडून सर्वात मोठी शांततेची भेट देत आहे. आज मी काहीच बोलणार नाही. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाजी..”

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

अशाप्रकारे सेहवानगे त्याचा जुना सहकारी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या वाढदिवसानिमित्त खास आठवणींना उजाळा देत शुभेच्छा दिल्या. सेहवागचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतिला उतरला आहे. व्हिडिओच्या शेवटी सेहवाग केळीचा साल काढून ते खाताना दिसत आहे.

सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ साली मुंबईत झाला. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने भारतीय संघासाठी पदार्पण केले आणि एक मोठी कारकीर्द उभी केली. त्याने विक्रमी ६ वेळा विश्वचषक संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो २०११ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा देखील भाग होता.

सचिन क्रिकेट जगतातील एक महान फलंदाज आहे आणि त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४३५७ धावांची नोंद आहे. कोणत्याही खेळाडूने केलेल्या या सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय धावा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील त्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्याने ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांच्या मदतीने १८४२६ आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके देखील आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

इकडे मुंबई इंडियन्स सलग ८ वी मॅच हरली अन् तिकडे रोहितची बाबर आझमशी तुलना सुरू झाली

‘मी देखील बेजबाबदार खेळलो,’ रोहितने मुंबईच्या सलग ८ व्या पराभावानंतर मान्य केली चूक

अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग: ऍक्वा रायडर्स संघाला विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---