भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर मंगळवारी (१६ नोव्हेंबर) मध्यप्रदेशच्या देवास जिल्ह्यात पोहोचला होता. सचिनच्या गाड्यांचा ताफा पाहून तेथील लोकांना विश्वास बसला नाही आणि ते त्या गाड्यांच्या मागे धावत सुटले होते. सचिन तेंडुलकर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या एका एनजीओच्या कार्यक्रमासाठी याठिकाणी पोहोचला होता. त्यानी हा दौरा शांततेत पार पाडण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीही लकांना या कार्यक्रमाविषयी माहिती मिळाली.
सचिन तेंडुलकर ‘परिवार फाउंडेशेन’ नावाच्या एका एनजीओसोबत जोडला गेलेला आहे. ही संस्था गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मोठ्या पातळीवर कार्यरत आहे. सचिन तेंडुलकरचे फाउंडेशनही गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. अशात सचिन आता या संस्थेसोबत सहभागी होऊन ६५० मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे.
सचिनने यावेळी बोलताना संगितेल की, त्याच्या वडिलांचे हेच स्वप्न होते की, ते गरीब मुलांची मदत करतील आणि त्यामुळे तो गरीब मुलांची मदत करून वडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहे. त्याने सांगितले की, आज जर त्याचे वडील जिवंत असते तर हे काम पाहून खूप आनंदी झाले असते. दरम्यान, सचिनने हे कार्य करण्यासाठी एक खास दिवस निवडला आहे. त्याने ज्यादिवशी त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी त्याने हे काम हाती घेतले.
Always a privilege to play for #TeamIndia – on the field or off it. Was satisfying to visit our seva kutirs & free residential school we are building with Parivaar.
Our children can make this world better & brighter. We just have to ensure all of them get equal opportunities. pic.twitter.com/0sqVRg2Fwl
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 16, 2021
सचिन या दौऱ्यावर असताना सीहोर जिल्ह्याच्या सेवनिया गावातही गेला होता. या जिल्ह्यातील सेवनिया, बिलपाटी, खापा, नयापुरा आणि जामुन झील या गावांतील गरीब मुल तेंडुलकर फाउंडेशेच्या मदतीने शिक्षण घेत आहेत. सचिनची संथ्या या मुलांच्या जेवणाचेही नियोजन करते. याठिकाणी जनजाती समाजाची मुले शिक्षण घेतात, ज्याचा खर्च सचिन तेंडुलकर उचलतो.
दरम्यान, या दौऱ्यासाठी सचिन मुंबई मधून थेट इंदौरमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर जमिनी रस्त्याने तो देवास आणि सीहोरला पोहोचला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर! आयसीसीने बीसीसीआयवर सोपवल्या ३ स्पर्धांच्या जबाबदाऱ्या, वाचा सविस्तर