---Advertisement---

सचिनची खोड काढणे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पडले होते महागात, चाहत्याने दिले होते असे उत्तर!

On: सोमवार, एप्रिल 24, 2023 11:11 AM
---Advertisement---

आज (24 एप्रिल) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामूळे जगभरातून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी सचिनला सोशल मीडियामधून शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिनप्रमाणेच आज पंच कुमार धर्मसेना 51 वा तर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डॅमीयन फ्लेमिंगही आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे क्रिकेट जगतातून त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 5वर्षांपूर्वी डॅमीयन फ्लेमिंगला @CricketcomAu या ट्विटर हँडलवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. डॅमियन फ्लेमिंगने सचिनचा त्रिफळा उडवतानाचा खास विडियो यासाठी वापरण्यात आला होता.

https://twitter.com/cricketcomau/status/988614485123387392

यावर सचिन प्रेमी तसेच भारतीय चाहत्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. परंतु त्यांनी तो विडियो अकाऊंटवरून काढला नाही. यामुळे भारतीय चाहत्यांनी नामी शक्कल लढवत सचिनने याच फ्लेमिंगला कव्हर ड्राईव मारतानाचा खास विडियो शेअर केला होता.  विशेष म्हणजे या चाहत्याच्या विडियोला अनेक लाईक्स आल्या होत्या. तसेच एक बर्थडे बाॅयकडून हे दुसऱ्याला गिफ्ट असल्याचेही या चाहत्याने ट्विटमध्ये म्हटले होते. 

https://twitter.com/iShhhshank/status/988641517714771970

सचिनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द 
सचिनने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठी यशाची शिखरे गाठली आहेत. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 200 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 53.78 च्या सरासरीने 51 शतकांसह15921 धावा केल्या आहेत. तसेच त्याने कसोटीत 46 विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय 463 वनडे सामन्यात 44.83 च्या सरासरीने 49शतकांसह 18426 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 154 विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने 1 आंतरराष्ट्रीय टी-20 सामनाही खेळलेला असून यात त्याने 10 धावा केल्या असून 1 विकेट घेतली आहे.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके केली असून हा टप्पा पार करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. तसेच तो सर्वाधिक कसोटी सामने खेळणाराही खेळाडू असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाराही क्रिकेटपटूही तोच आहे.

फ्लेमिंगची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
फ्लेमिंगने त्याच्या कारकिर्दीत 20 कसोटी सामने खेळताना 25.89 च्या सरासरीने 75 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 88 वनडे सामन्यात त्याने 25.38 च्या सरासरीने 134 विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
सचिन वाढदिवस विशेष लेख –
सचिन ९२वर खेळतोय रे…!!
सतत ऑस्ट्रेलियाला नडणारा मास्टर ब्लास्टर…
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सचिन सचिनसारखाच खेळला
वाढदिवस विशेष: सचिन- क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…
खास आठवण, सचिनचा २०० वा कसोटी सामना आणि मान्यवरांचे ट्विट्स…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment