---Advertisement---

‘काळजीची आवश्यकता नाही,’ बालपणीच्या मित्राने दिली सचिनच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहीती

On: रविवार, एप्रिल 4, 2021 8:23 AM
---Advertisement---

भारतात सध्या कोविड-१९ महामारीने पाय पसारले आहेत. काही दिवसांपुर्वी मास्टर ब्लास्टर आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर हादेखील कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. त्यानंतर त्याने स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले होते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्याने जवळच्या रुग्णालयात भरती झाला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या मनाची धाकधुक वाढली असून सचिन लवकर बरा व्हावा म्हणून क्रिकेटप्रेमी प्रार्थना करत आहेत.

अशात सचिनचा लहानपणीचा मित्र अतुल रानडे याने त्याच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना रानडेने सांगितले की, “सचिनच्या प्रकृतीची जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाही. रुग्णालयामध्ये चांगले उपचार मिळतील म्हणून तो तेथे दाखल झाला आहे. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत होती आणि त्यामुळे त्याने रुग्णालयात दाखल होणे गरजेचे होते. तिथे सर्वप्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून तो रुग्णालयात भरती झाला आहे.”

एप्रिल २, रोजी पूर्ण भारतात २०११ सालच्या विश्वचषक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला जात होता. अशात सचिननेही त्याच्या संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा देत आपण रुग्णालयात भरती झालो असल्याची माहिती दिली होती.

ट्विट करत त्याने लिहिले होते की, ‘मला शुभेच्छा देण्यासाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. माझ्या कुटुंबीयांना माझ्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये मी वैद्यकिय सल्ल्यानुसार जवळच्या रुग्णालयात क्वारंटाईन झालो आहे. लवकरच मी घरी परतण्याची आशा करतो. सर्व भारतवासींना आणि माझ्या संघ सहकाऱ्यांना विश्वचषक विजयाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा.’

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! कोरोनाची बाधा झालेला सचिन रुग्णालयात भरती, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

सचिन तेंडुलकरला हॉस्पिटलमध्ये दाखल करताच माजी पाकिस्तानी खेळाडूकडून आला ‘हा’ खास संदेश

IPL 2021: लिलावात अनसोल्ड राहिलेला ‘हा’ खेळाडू आता केकेआर संघात सामील, मागीलवर्षी होता आरसीबीचा भाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---