---Advertisement---

सचिनसाठी 15 नोव्हेंबरचा दिवस आहे ‘मास्टर ब्लास्टर’; क्रिकेटमधील पदार्पण, निवृत्तीशी आहे खास कनेक्शन

---Advertisement---

क्रिकेटचा महान खेळाडू, ज्याला पाहून अनेक लहानग्यांनी क्रिकेटपटू होण्याची स्वप्न पाहिलीत तो म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी 15 नोव्हेंबर ही खूप खास तारीख आहे.

याच दिवशी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या मैदानाचा निरोप घेतला होता. 15 नोव्हेंबर ही तारीख येताच सचिन वानखेडे स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये परतल्याचे चित्र, प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या डोळ्यांसमोर येत असते. 15 नोव्हेंबरला सचिनने क्रिकेटच्या मैदानाला निरोप तर दिलाच, पण याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊलही टाकले होते. आजच्याच दिवशी म्हणजे 32 वर्षांपूर्वी 15 नोव्हेंबर 1989 रोजी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पहिल्यांदा खेळपट्टीवर उतरला होता.

सचिन तेंडुलकरने आपला पहिला सामना, भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. सचिनने कराचीत झालेल्या कसोटी सामन्यात खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि संपूर्ण क्रिकेटविश्वाला आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली होती. महत्वाचे म्हणजे, नऊ वर्षांपूर्वी (2013) याच दिवशी सचिनने आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीला निरोप दिला होता.

मुंबई येथील वानखेडेवर स्टेडियमवर, 14 ते 16 नोव्हेंबर (2013) दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेला कसोटी सामना सचिनच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला होता. सचिनने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 74 धावा केल्या होत्या. या कसोटी सामन्यानंतर सचिनने क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट या दोन्ही प्रकारामध्ये सचिनच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत.

सचिन तेंडूलकरने आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 200 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये 15 हजार 921 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने नाबाद 248 धावांची त्याची सर्वोत्तम खेळी होती. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके आणि 68 अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर त्याने 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा केल्या आहेत. ज्यात त्याच्या नाबाद 200 धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके आणि 96 वनडे अर्धशतके केली आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत फक्त एकच आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला, ज्यामध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना 10 धावा केल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शाहीन आफ्रिदीची दुखापत गंभीर आहे की नाही? पीसीबीने स्वतः दिली माहिती
डेविड वॉर्नरने अशी काय चूक केली, ज्यामुळे मागावी लागली रश्मिकाची माफी? पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---