मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर नेहमीच गरजू व्यक्तींच्या मदतीला धावून येताना दिसतो. अशाच प्रकारे तो पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे. सचिनने आसाममधील एका रुग्णालयात वैद्यकीय उपकरणे दान केली. याचा फायदा वंचित कुटुंबातील २००० पेक्षा अधिक मुलांना होईल.
‘युनिसेफचा सदिच्छादूत’ सचिनने आसाममधील करीमगंज जिल्ह्यात असलेल्या मकुंदा रुग्णालयामधील बालरोगतज्ज्ञांच्या अतिदक्षता विभाग आणि नवजात अतिदक्षता विभागाला आवश्यक उपकरणे दान केली.
सचिनच्या संस्थेने मध्य प्रदेशातील आदिवासी जमातींना पोषण आणि औषधे पुरवण्यासदेखील मदत केली आहे. मकुंदा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय आनंद ईस्माईल यांनी या मदतीसाठी सचिन तेंडुलकरला धन्यवाद दिला आहे.
ते म्हणाले, “सचिन तेंडूलकर संस्थेच्या मदतीने एकम संस्थानची संघटना आम्हाला कमी खर्चात गरीब लोकांना चांगल्या सुविधा पुरवण्यात मदत करेल.”
विशेष म्हणजे यापूर्वीही सचिन तेंडूलकरने कोरोना व्हायरसमुळे लागलेल्या लॉकडाऊनदरम्यान शासनाला मदत केली होती. त्याने पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीमध्ये प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत केली होती. याव्यतिरिक्त त्याने मुंबईमधील ५००० कुटुंबानाही एक महिन्यापर्यंत जेवण पुरवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-आर्थिक संकटाने ग्रस्त असलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन आला पुढे
-सचिन विराटच्या बॅटची काळजी घेणारा देतोय मृत्यूशी झुंज, काही क्रिकेटरकडून तर…
-संघ महत्त्वाचा की कुटुंब? विराटने पालकत्व रजा घेतल्याने चाहत्यांमध्ये पडले दोन गट
ट्रेंडिंग लेख-
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
-ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण
-रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर