मुंबई | आयपीएलप्रेमी चातकासारखा वाट पाहात असलेला सामना, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामना झाला. आयपीएल २०२२ मधील हा ३३ वा सामना होता. मुकेश चौधरीची गोलंदाजी आणि एमएस धोनीच्या झटपट खेळीच्या जोरावर चेन्नईने ३ विकेट्स राखून मुंबईला पराभूत केले. मुंबईचा हा हंगामातील सलग सातवा पराभव होता. मुंबईच्या या दारुण पराभवानंतर संघाचा मार्गदर्शक सचिन तेंडूलकर याने प्रतिक्रिया दिली आहे.
मेगा लिलावात मुंबई संघातील (Mumbai Indians) बरेच प्रमुख खेळाडू इतर संघांमध्ये गेले आहेत. याचमुळे सध्या मुंबईचा संघ युवा असून ते त्यांच्या चुकांमधून (Sachin Explained Why Mumbai Indians Struggling) शिकतील, असे सचिनचे (Sachin Tendulkar) म्हणणे आहे. तो म्हणाला की, “मुंबई इंडियन्स संघ सध्या कठिण वेळेतून जात आहे. परंतु या अवघड वेळेतही आम्हाला एकत्र राहावे लागेल आणि संघाच्या रूपात पुढे जावे लागेल. मुंबईचा सध्याचा संघ युवा आहे. ते चुका करतील आणि त्यांच्या चुकांमधून शिकतील.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मुंबईने आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच वर्षे पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. कदाचित त्यांच्या याच प्रदर्शनामुळे मुंबई संघाकडून चाहत्यांना अनेक अपेक्षा आहेत.
याबद्दल बोलताना सचिन म्हणाला की, “आपल्याला सर्वात आधी हे समजून घ्यावे लागेल की, क्रिकेटच्या या स्वरूपात कोणताही संघ असा नसेल, ज्याने हा अनुभव घेतला नसेल. टी२० स्वरूपात बऱ्याचदा सामन्यादरम्यान महत्त्वपूर्ण क्षण आपल्या फेव्हरमध्ये जात नाहीत. तुम्ही कधी २ वा ३ वा शेवटच्या चेंडूवर पराभूत होत असता. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, यावेळी बऱ्याचशा संधी आमच्या बाजूने राहिल्या नाहीत. मी अजून एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितोय. ती अशी की, मुंबई संघातील खेळाडू अशा प्रदर्शनानंतर सराव सत्रामध्ये मेहनत घेण्यास कोणतीही कसर सोडत नाहीत.”
दरम्यान, मुंबई संघाला या हंगामात अपेक्षित प्रदर्शन करता आलेले नाही. त्यांनी आतापर्यंत ७ सामने खेळले असून हे सातही सामने गमावले आहेत. परिणामी गुणतालिकेत सध्या मुंबई संघ तळाशी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुकेश चौधरीच्या यॉर्करवर गोंधळला इशान किशन, कोसळला मैदानावर अन् इकडे उडून पडले स्टंप्स
शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी