---Advertisement---

राशिद खानविरुद्ध फटकेबाजी करायचीय, मास्टर ब्लास्टरने दिले ‘हे’ उत्तर

On: रविवार, नोव्हेंबर 1, 2020 10:57 PM
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमध्ये सध्याच्या काळात ज्या प्रकारे विराट कोहली सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो कोणत्याही गोलंदाजाच्या चेंडूवर फटकेबाजी करू शकतो. त्याचप्रकारे सध्याच्या काळात एक गोलंदाजही आहे. तो मोठ- मोठ्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणतो. तो गोलंदाज म्हणजेच अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान. राशिदच्या गोलंदाजीचा सामना कसा करायचा, असे यूट्यूबवर एका चाहत्याने विचारले. त्यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्रत्युत्तर दिले आहे.

राशिद खान करतोय धमाकेदार कामगिरी

अफगाणिस्तानचा संघ असो किंवा टी२० क्रिकेट लीग किंवा आयपीएल, राशिद खान प्रत्येक ठिकाणी धमाकेदार कामगिरी करत आहे. त्याने एक खतरनाक गोलंदाज म्हणून आपली छाप पाडली आहे. त्याची फिरकी गोलंदाजी समजणे फलंदाजांसाठी कठीण झाले आहे.

सचिनने दिले प्रत्युत्तर

राशिद खानच्या गोलंदाजीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना सचिनने म्हटले की, “राशिद एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. मी त्याच्या गोलंदाजीवर कधीही खेळलो नाही. परंतु मी त्याच्याबद्दल जे काही पाहिले आणि ऐकले, त्यावरून तो ज्याप्रकारे गुगली गोलंदाजी करतो, ते खूप कमी फलंदाजांना खेळता येते.”

“त्यामुळे एक जागतिक गोलंदाजासोबत तुम्ही कधीच अंदाज लावू शकत नाही की, तो पुढचा कोणता चेंडू टाकणार आहे. मी त्याच्याविरुद्ध खेळलो नाही, पण त्याला जेव्हा पाहिले, तेव्हा तो मागच्या कोनातून गोलंदाजी करतो,” असेही पुढे बोलताना सचिन म्हणाला.

राशिदच्या गोलंदाजीबद्दल बोलताना सचिनने म्हटले की, “गोलंदाजाची ग्रिप पाहणे खूप महत्त्वपूर्ण आहे. गोलंदाज अनेकवेळा आपली ग्रिप लपवतो. केवळ एक गोष्ट तो लपवू शकत नाही, ती म्हणजे तो चेंडू रिलीझ कसा करतो. हे खूप वेगाने घडत असते. परंतु कधी-कधी तुम्ही वेळ घेता की, गोलंदाज काय करण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्याच्या रन- अपचे निरीक्षण करतो की, जेव्हा तो गोलंदाजी करतो, तेव्हा त्याचे हात कसे असतात.”

राशिद खान सध्या आयपीएल २०२० मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासोबत युएईत आहे. त्याने या हंगामात खेळलेल्या १३ सामन्यांत एकूण १८ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-पुरंदरच्या ‘या’ पठ्ठ्याने चेन्नईची लाज राखली; सलग तीनही सामन्यात ठोकली अर्धशतके

-‘तेरे गाल मोठे, या मेरे’ युवीचा रोहित आणि पंतला टोमणा; ट्विट व्हायरल

-बापरे! वयाची चाळीशी ओलांडणाऱ्या गोलंदाजाने घेतली चाळीशी पार करणाऱ्या फलंदाजाची विकेट

ट्रेंडिंग लेख-

-सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ

-एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’

-IPL 2020: प्रतिभाशाली असूनही पंजाब संघाकडून एकाही सामन्यात संधी न मिळालेले ५ युवा क्रिकेटर्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---