लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकातच 107 धावांवर संपुष्टात आला.
या डावात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. या डावात त्याची उत्तम गोलंदाजी पहायला मिळाली, त्यामुळे अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
यात भारताचा हरभजन सिंगनेही त्याच्या हटके शैलीत अँडरसनने भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयला बाद केलेल्या चेंडूला दाद दिली आहे.
अँडरसनने भारताला डावाच्या पहिल्याच षटकात पहिला धक्का दिला होता. त्याने या षटकात पहिले चार चेंडू आॅफस्टंपच्या बाजुला टाकले. पण पाचवा चेंडू त्याने मिडल स्टंपवर टाकत विजयला शुन्य धावावर त्रिफळाचीत केले.
या चेंडूबद्दल हरभजनने थेट दिग्गज फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ट्विट करत प्रश्न विचारला आहे की हा चेंडु कसा खेळायचा? सचिन प्लिज तू सांगू शकतो का? खूप चांगला चेंडू होता.”
How do u play this ball ? paji can u explain plz @sachin_rt what a beauty https://t.co/1m0Ri5RXix
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) August 10, 2018
यावर तेंडुलकरनेही हरभजन प्रमाणे मजेदार शैलीत याचे उत्तर दिले आहे. “अँडरसनने टाकलेला चेंडू अफलातून होता. पण हरभजन अनेकांनी मला तूझ्या ‘दुसरा’ चेंडूवर बाद झाल्यावर हाच प्रश्न विचारला होता.”
What a fantastic delivery by @Jimmy9! But this is a question many have asked after getting foxed by your doosra as well😜 @harbhajan_singh. https://t.co/5T9D3MUfRL
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 11, 2018
अँडसनने भारताचे विजय, केएल राहुल, अजिंक्य रहाणे या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले आहे. तर कुलदीप यादव आणि इशांत शर्मा या तळातल्या फलंदाजांनीही त्याने बाद केले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–जेव्हा अर्जुन तेंडुलकर बनतो विक्रेता
–लॉर्ड्स कसोटीः भारतीय गोलंदाजांची कमाल, इंग्लंडच्या आघाडीच्या फळीला खिंडार
–२० वर्षीय खेळाडूने केले लाॅर्ड्सवर कसोटी पदार्पण, चौकार मारत घेतली पहिलीच धाव