---Advertisement---

सचिन तेंडुलकरने प्रचंड वेदनेत असून देखील खेळली होती ‘ती’ सिरीज, रॉबिन उथप्पाने केला खुलासा

On: शनिवार, मे 22, 2021 1:08 AM
---Advertisement---

लॉकडाऊनच्या काळात खेळाडूंना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान क्रिकेटर रॉबिन उथप्पा यानेही आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. रॉबिनने नुकताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या एका खेळीबद्दल खुलासा केला आहे.

त्याने सांगितले आहे की 2008 कॉमनवेल्थ मालिकेमध्ये सचिन तेंडुलकर यांना शारीरिकदृष्ट्या बरे वाटत नव्हते तरी त्यांनी शानदार कामगिरी केली होती.

रॉबिन म्हणाला की, ‘इतक्या वेदनेमध्ये सचिन यांनी कशी फलंदाजी केली यावर मला अजूनही विश्वास होत नाही. मी त्यांना पाजी म्हणतो. ते कॉमनवेल्थ मालिकेत खूप वेदनेत खेळले. त्यांना शारीरिकदृष्ट्या बरे नव्हते तरी देखील त्यांनी खूप वेदनेत फलंदाजी केली. असे अनेकवेळेस झाले, जेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर वेदना दिसून येत होत्या. जेव्हा आम्ही विचारायचो की तुम्ही ठीक आहात का, तेव्हा ते उत्तर द्यायचे, मी पूर्णतः ठीक आहे.’

रॉबिन पुढे म्हणाला, ‘मला आठवत आहे की आम्ही मालिकेदरम्यान पाजींशी चर्चा करायचो. ते मला म्हणाले होते की रॉबिन वयाच्या 32, 33 किंवा 34 वर्षानंतर स्वत: ला तंदुरुस्त ठेवणे हे एक कठीण काम आहे. कारण यानंतर ते अधिक आव्हानात्मक होते. तेव्हा दुखापतींचा अधिक परिणाम होण्यास सुरवात होते. जेव्हा मी हे त्यांच्याशी बोलत होतो, तेव्हा मी 21 किंवा 22 वर्षांचा होतो. मी तेव्हा त्यांना उत्तर दिले की, ‘नाही पाजी, तुम्ही हे असेच म्हणत आहात. यावर पाजी म्हणाले की जेव्हा तु 35 वर्षांचा होशील तेव्हा आपण या बद्दल बोलू. आपण बघू की तू मझ्याशी सहमत आहेस की नाही. आता जेव्हा मी 35 वर्षांचा आहे, तेव्हा मला असे म्हणायचे आहे की ते 200 टक्के बरोबर होते.’

ROBIN UTHAPPA on Sachin, Hanging Ball and Being Scared of Venky

सचिनने कॉमनवेल्थ मालिकेच्या 10 सामन्यांत 399 धावा केल्या होत्या. तसेच रॉबिन उथप्पा देखील त्या भारतीय संघाचा सदस्य होता आणि सचिनबरोबर त्याने 50 आणि 94 धावांच्या दोन महत्त्वपूर्ण भागीदारी केल्या होत्या.

सचिनने त्या मालिकेत सिडनीमध्ये 117 धावांची खेळी केली होती. त्याची ही खेळी भारताला मालिकेत आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली होती. तसेच ब्रिस्बेनमध्ये दुसऱ्या अंतिम सामन्यात त्याने 91 धावांची खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

बुढ्ढा होगा तेरा बाप! ४५ वर्षाच्या ‘या’ खेळाडूने पाडला १५ चौकार आणि १५ षटकारांचा पाऊस

टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारत गमावणार? या देशात होऊ शकते आयोजन

इंग्लंड दौऱ्यापूर्वी आपल्या ‘या’ कौशल्याला धार देतोय रविंद्र जडेजा, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---