भारतीय संघाचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक वर्षांपूर्वी क्रिकेटला निरोप दिला असला, तरी त्याचे नाव अजूनही क्रिकेटच्या विश्वात प्रसिद्ध आहे. भारतातील प्रत्येक घराघरात क्रिकेटचा प्रसार करण्यात आणि जगभरात भारतीय क्रिकेटला ओळख मिळवून देण्यात सचिन तेंडुलकरचे सर्वात मोठे योगदान आहे. जवळपास 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देणारा सचिन तेंडुलकर अजूनही लाखो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. म्हणूनच बीसीसीआयने सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधील त्याच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे. बीसीसीआयने त्याला कर्नल सी.के.नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.
A historic moment 👏👏
The legendary Mr. Sachin Tendulkar receives the 𝗖𝗼𝗹. 𝗖.𝗞. 𝗡𝗮𝘆𝘂𝗱𝘂 𝗟𝗶𝗳𝗲𝘁𝗶𝗺𝗲 𝗔𝗰𝗵𝗶𝗲𝘃𝗲𝗺𝗲𝗻𝘁 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 🏆 from ICC Chair Mr. Jay Shah 👌#NamanAwards | @sachin_rt | @JayShah pic.twitter.com/V7uwi7yjhN
— BCCI (@BCCI) February 1, 2025
वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 1989 मध्ये पाकिस्तानमध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनची कारकीर्द 24 वर्षांची होती. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांसोबतच 100 शतके मारण्यचा महान विक्रमही केला. कसोटी असो वा एकदिवसीय सामना, दोन्ही स्वरूपात सचिनने खोऱ्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
सचिनच्या महान योगदानाने आयसीसीचे अध्यक्ष जय शाहांनी सचिनला जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. यावेळी सचिनला त्याचे जुने दिवस आठवले. जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यावर तो म्हणाले, “बीसीसीआयचे कितीही आभार मानले तरी ते पुरेसे ठरणार नाही. बोर्डाने नेहमीच पाठिंबा दिला आहे. पुरस्कार विजेत्यांच्या यादीत माझे नाव पाहून मला खरोखर आनंद झाला आहे.”
यावेळी बोलताना सचिन नवोदित खेळाडूंना सल्ला देत म्हणाला, “क्रिकेटशिवाय आपण सर्वजण या खोलीत बसलो नसतो. तुम्ही हळूहळू तुमच्या करिअरवरील पकड गमावू लागता. काही गोष्टी विचलित होतील, पण त्यांचा तुमच्यावर आणि तुमच्या करिअरवर परिणाम होऊ देऊ नका. जेव्हा तुमच्याकडे सर्वकाही असेल तेव्हा गोष्टींचा मान राखा. तुमच्या मनात क्रिकेट विषयी खुप आदर आहे, त्यामुळे तुमचे सर्वस्व पणाला लावा. जेव्हा हे सर्व संपेल, तेव्हाच तुम्हाला कळेल की तुम्ही काय गमावत आहात”.
हेही वाचा :
बुम-बुमचा दबदबा; आयसीसीनंतर बीसीसीआयने देखील केला विशेष सन्मान….
टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला मोठा धक्का!
“विराट कोहलीला रणजी सामना खेळण्याची…” माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य