---Advertisement---

टीम इंडियाला मिळणार राशिद खानसारखा अव्वल फिरकीपटू? सचिनने शोधलाय नवा हिरा!

---Advertisement---

सोशल मीडियावर येणारे विविध प्रकारचे व्हिडिओ बऱ्याच वेळी खूप प्रभावी असतात. सामान्य व्यक्तींपासून तर मोठमोठ्या सेलेब्रिटीपर्यंत अनेकांना हे व्हिडिओ भुरळ घालत असतात. असाच काहीसा किस्सा नुकताच घडला आहे. महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेला सचिन तेंडुलकर आता सक्रिय खेळाडू नसेल. पण त्याचे खेळावरील प्रेम अजूनही अबाधित आहे. सध्या, सचिन कोणत्याही संघाचा प्रशिक्षक नाही किंवा समालोचनही करत नाही. पण सोशल मीडियावर खूप सक्रिय राहतो.

गुरुवारी (१४ ऑक्टोबर) त्याने एका मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्या लहानग्याचा लेग स्पिनला पाहून खूप प्रभावित झाला आहे. त्याने व्हिडिओमध्ये दिसणारा लहान मुलगा कोण आहे? याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु एका मित्राने त्याला हा व्हिडिओ पाठवला असल्याचे सचिनने स्पष्ट केले आहे.

सचिनने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात मुले रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा गोलंदाजी करताना फलंदाजाला त्याच्या लेगब्रेक फिरकीने चकवताना दिसत आहे. हा लहानगा अनेक प्रकारचे चेंडू टाकत असल्याचे दिसत आहे आणि या प्रकारच्या गोलंदाजीत चांगलाच पारंगत असल्याचे दिसत आहे. तो फलंदाजाला आपल्या गुगलीने चकवतांनाही दिसत आहे.

मुलाची अप्रतिम गोलंदाजी पाहून सचिनही आश्चर्यचकित झाला आहे. त्याने मुलाच्या या अद्भुत कौशल्याचे कौतुक केले. ४८ वर्षीय सचिनने असेही आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘व्वा. मित्राकडून हा व्हिडिओ मिळाला. हे खूप विलक्षण आहे. या लहान मुलाचे खेळासाठी असलेले प्रेम आणि आवड ही अद्भुत आहे.’

सचिनची ही पोस्ट आतापर्यंत ४४०० पेक्षा जास्त वेळा रिट्विट करण्यात आली आहे. एवढेच नाही तर ३४ हजारांहून अधिक लोकांनी त्याला पसंती देखील दिली आहे. काहींनी तर सचिनने राशिद खानसारखा प्रतिभाशाली फिरकीपटू सचिनने शोधला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

खडतर प्रवासानंतर कोलकात्याची फायनलमध्ये धडक, पण चेन्नईची ‘ही’ आकडेवारी घाम फोडणारी

अंतिम सामन्यात सीएसकेसाठी ‘हा’ धुरंधर ठरेल कर्दनकाळ! कर्णधार धोनीला भक्कम रणनितीची गरज

केकेआरचा कॅप्टन मॉर्गन घेणार धाडसी निर्णय, फायनलमध्ये स्वत: बाकावर बसत ‘या’ खेळाडूला देणार संधी!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---