ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मागील बऱ्याच वर्षांपासून नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिडनी येथे होणाऱ्या कसोटी सामन्याला पिंक कसोटी घोषित करण्यात येते. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू ग्लेन मॅग्रा व त्याची मॅग्रा फाउंडेशन या कसोटीद्वारे स्तनाच्या कॅन्सरसंदर्भात जनजागृती करत असते.
कोरोनामुळे यावेळी मॅग्राला मैदानावर जाणे अशक्य झाले आहे, मात्र तो विविध क्रिकेट खेळाडूंना याबाबत माहिती देवून जागृती करत आहे. अशातच ग्लेन मॅग्राच्या या मोहिमेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ही शुभेच्छा दिलेल्या आहेत.
सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून मॅग्रा सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत सचिनने मॅग्राला त्याच्या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सचिनने विशेष उल्लेख केला तो सर्व नर्सचा. मॅग्राच्या या उपक्रमाशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सचिनने कौतुक केले आहे. तसेच या फोटोमध्ये सचिन त्याची कसोटी जर्सी मॅकग्राला देताना दिसत आहे.
https://twitter.com/sachin_rt/status/1346717063046422530
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी येथे खेळला जाणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यानंतर दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असल्याने तिसऱ्या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींना आशा असेल की अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात उत्तम कामगिरी करेल. तसेच हा सामना पिंक कसोटी म्हणूनही ओळखला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या बालपणीच्या कोच म्हणतात, ‘हा’ शॉट रोहित शर्मा इतका उत्तम कोणीही खेळत नाही
सैनीचा सिडनी कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यामागे ‘हे’ आहे सर्वात मोठे कारण
बापरे…! तब्बल ११ खेळाडूंनी अजिंक्यच्या नेतृत्वात केले आहे आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण






