मुंबई। शनिवारी मुंबई इंडियन्सने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात हैद्राबादला 40 धावांनी पराभूत केले. या सामन्यात मुंबईकडून 6 विकेट्स घेणारा जोसेफ अल्झारी सामनावीर ठरला.
त्याने या सामन्यात 3.4 षटके गोलंदाजी करताना 12 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. त्याने या सामन्यात डेव्हिड वॉर्नर, विजय शंकर, दीपक हुडा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल यांच्या विकेट्स घेतल्या.
तसेच 22 वर्षीय जोसेफने आयपीएलच्या इतिहासात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विक्रमही केला. हा विक्रम करताना त्याने 2008 ला राजस्थानकडून सोहेल तन्वीरने घेतलेल्या 14 धावांतील 6 विकेट्सचा विक्रमही मोडला.
विशेष म्हणजे जोसेफचा हा पहिलाच आयपीएल सामना होता. त्याने या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.
जोसेफच्या या शानदार कामगिरीमुळे त्याच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या कामगिरीबद्दल कौतुक करताना भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिनने ट्विट केले आहे की ‘मुंबई इंडियन्सच्या नव्या संघसहकाऱ्याने केलेली गोलंदाजी पहायला मी तिथे असायला हवे होते. जोसेफ तूझी कामगिरी अफलातून आहे.’
सचिन बरोबरच अनेकांनी जोसेफचे ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केले आहे.
जोसेफ त्याच्या या शानदान गोलंदाजी प्रदर्शनानंतर म्हणाला, ‘ही स्वप्नवत सुरुवात होती. यापेक्षा आणखी चांगले काही असू शकत नाही. मी योजनेनुसारच गोलंदाजी करण्याचा विचार केला होता. जेव्हा मला सांगण्यात आले की मी खेळणार आहे तेव्हा मी सर्वकाही सोपे ठेवण्याचा आणि स्वत:वर विश्वास ठेवयचे ठरवले.’
‘जेव्हा मला पहिली विकेट मिळाली मी शांततेत ती साजरी केली. कारण मला खेळावर लक्ष केंद्रीत करायचे होते. आम्हाला जिंकायचे होते. खेळाडू खरंच चांगले खेळले. आम्ही मेहनत केली आहे त्यामुळे आम्हाला मैदानात जाऊन आम्ही हे करु शकतो हे दाखवून द्यायचे होते.’
शनिवारी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 136 धावा केल्या होत्या आणि हैद्राबाद समोर 137 धावांचे आव्हान ठेवले होते. हैद्राबाद हे आव्हान सहज पार करेल असे वाटत असतानाच मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत हैद्राबादला 17.4 षटकातच 96 सर्वबाद केले आणि 40 धावांनी विजय मिळवला.
https://twitter.com/sachin_rt/status/1114600858849689600
https://twitter.com/MichaelVaughan/status/1114584696556535808
https://twitter.com/tiwarymanoj/status/1114603084729085952
https://twitter.com/mohanstatsman/status/1114588074237759488
https://twitter.com/bhogleharsha/status/1114587543171780609
https://twitter.com/saurabh_42/status/1114587237436489728
https://twitter.com/sanjaymanjrekar/status/1114590757959000064
https://twitter.com/ImRo45/status/1114846807102767104
https://twitter.com/hardikpandya7/status/1114795547100053504
https://twitter.com/cricketwallah/status/1114586769461145600
महत्त्वाच्या बातम्या-
–जेव्हा एमएस धोनी वॉटसन, ताहीरच्या मुलांबरोबर लावतो शर्यत…, पहा व्हिडिओ
–आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूने केलेला तो विक्रम अखेर ११ वर्षांनी मोडीत…






