---Advertisement---

चर्चा तर होणारच! वाढदिवसाच्या दिवशी सचिन दिसला नव्या लूकमध्ये; चाहत्यांनी केली ‘या’ व्यक्तींबरोबर तुलना

On: शनिवार, एप्रिल 24, 2021 4:25 PM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज (२४ एप्रिल) त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याबरोबरच त्याच्याबद्दल अनेक आठवणी आज ताज्या केल्या जात आहेत. एवढंच नाही तर सध्या त्याच्या नव्या लूकचीही बरीच चर्चा आहे.

क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यावेळी दाट कुरुळ्या केसांमध्ये दिसणाऱ्या सचिनचा लूक कालांतराने बदलत गेला. त्याच्या अनेकदा बदललेल्या लूकची चर्चाही बरीच झाली. नुकताच सचिन एका वेगळ्या लूकमध्ये चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

काहीदिवसांपूर्वीच कोविड-१९ या आजारातून बरा झालेल्या सचिनने त्याच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमार्फत त्याने संदेश दिला आहे की जे कोविड-१९ या आजारातून बरे झाले आहेत, त्यांनी प्लास्मा थेरपीसाठी रक्तदान करावे. तसेच तो स्वत: देखील रक्तदान करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये सचिनचा नवा लूक चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. त्यामुळे त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सचिन या व्हिडिओमध्ये दाढी वाढवलेल्या लूकमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी चाहत्यांनी सचिनना दाढी वाढवलेल्या लूकमध्ये खुप क्वचितच पाहिले असल्याने चाहत्यांसाठी त्याचा हा लूक अगदीच नवा आहे.

काहींनी सचिन त्याचा मोठा अजित सारखा दिसतो असे म्हटले आहे, तर काहींनी तो मॅराडोनासारखा दिसतो म्हटले आहे. काहींनी त्याच्या या लूकची तुलना सुपरस्टार रजनीकांत यांच्याशीही केली आहे.

https://twitter.com/jammy12_/status/1385891274176167938

https://twitter.com/iamakt27/status/1385863906103422978

https://twitter.com/Mathesh_SFC/status/1385863401939738625

सचिनला झाला होता कोरोना 
सचिनने २७ मार्च रोजी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी तो हॉस्पिटलमध्येही दाखल झाला होता. त्यानंतर ८ एप्रिल रोजी त्याला घरी सोडण्यात आले होते.

सचिनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द 
सचिनने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठी यशाची शिखरे गाठली आहेत. त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ५३.७८ च्या सरासरीने ५१ शतकांसह १५९२१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने कसोटीत ४६ विकेट्स घेतल्या आहेत.

याशिवाय ४६३ वनडे सामन्यात ४४.८३ च्या सरासरीने ४९ शतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने १५४ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने १ आंतरराष्ट्रीय टी२० सामनाही खेळलेला असून यात त्याने १० धावा केल्या असून १ विकेट घेतली आहे.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके केली असून हा टप्पा पार करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. तसेच तो सर्वाधिक कसोटी सामने खेळणाराही खेळाडू असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाराही तो क्रिकेटपटू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

KKRvCSK: ‘संघ सहकाऱ्यांचा सामना करण्याची..,’ बाद झाल्यानंतर पायऱ्यांवर बसण्यामागील कारणाचा रसेलने केला खुलासा

सचिन ९२वर खेळतोय रे…!!

‘एक दिवस मीही आयपीएल खेळेल,’ पाकिस्तानी फलंदाजांचे कंबरडे मोडणाऱ्या गोलंदाजाचे आहे मोठे स्वप्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---