भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्मा (rohit sharma) मागच्या बऱ्याच महिन्यांपासून सतत चांगले प्रदर्शन केले आहे. मर्यादित षटकांमधील त्याचे प्रदर्शन पाहून त्याच्याकडे भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवले गेले. तर दुसरीकडे कसोटी क्रिकेटमध्ये देखील तो अप्रतिम प्रदर्शन करत आहे. रोहित मागच्या काही कसोटी मालिकांमध्ये सतत धावा करत आहे. अशात दिग्गज सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) याने रोहितच्या कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शनाची दखल घेतली आहे आणि त्याचे कौतुक केले आहे.
टी-२० आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासोबत रोहितला कसोटी संघाचे उपकर्णधारपद देखील दिले गेले आहे. यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितने कसोटी मालिकेत अप्रतिम खेळी केली होती. विराट कोहली या मालिकेत अनुपस्थित होता. पण रोहितच्या प्रदर्शनाच्या जोरावर भारताने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. तसेच इंग्लंड दौऱ्यात कोहली, पुजारा आणि रहाणे या तिन्ही फलंदाजांनी निराशा केली, पण रोहितने याठिकाणी देखील चांगले प्रदर्शन करून दाखवले. एकंदरीत पाहता रोहितने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत.
सचिन तेंडुलकर बोरिया मजूमदार यांच्या ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ कार्यक्रमात बोलत होता. यावेळी रोहितचे कौतुक करताना सचिन म्हणाला, “हे मानसिकतेवर निर्भर आहे. जेव्हा तुम्ही स्वत:लाच विचारायला सुरू करता की, हे असे काहीतरी आहे, जे मी करणार नाही. मी जास्तीत जास्त एवढेच सांगेल की, तुम्ही काय करायला नको, यापेक्षा प्रयत्न करा आणि स्वतःला विचारा की, तुम्हाला काय कराण्याची अपेक्षा आहे आणि तुम्ही काय करायला पाहिजे.”
हेही वाचा-‘या’ भारतीय क्रिकेटपटूला यावर्षी सर्वाधिक वेळा केले सर्च, रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर
“विरोधी संघ घाबरलेल्या मानसिकतेचा फायदा घेऊ शकतो. हे सगळे सकारात्मक दृष्टिकोनाविषयी आहे, हे तुमच्या शरीरात वाहणारी उर्जा दाखवते. आदमखोराला ज्याप्रकारे त्याच्या शिकारीविषयी कळते की, ती कुठेतरी आसपास आहे, त्याप्रकारे रोहितला माहिती आहे, केव्हा आणि कधी गोलंदाजावर आक्रमण करायचे आहे,” असे सचिन पुढे म्हणाला.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितने ज्याप्रकारे दमदार प्रदर्शन करून कसोटी संघात पुनरागमन केले होते; त्याच प्रकारे तो इंग्लंडमध्ये खेळला होता. इंग्लंड दौऱ्यात रोहितने ३६८ धावा केल्या होत्या आणि भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी २०२१ : ‘दबंग दिल्ली’ ठरली ‘यू मुंबा’वर भारी, जोरदार पुनरागमनासह ३१-२७ ने जिंकला सामना
पुजाराला आला टीम मॅनेजमेंटचा खास मैसेज, रोहितच्या अनुपस्थित दिली ‘मोठी जबाबदारी’
रहस्य उलगडले, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत भारताचे ‘हे’ २ धुरंधर करणार ओपनिंग?
व्हिडिओ पाहा –