क्रिकेट विश्वात ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. सचिनच्या नावावर क्रिकेट विश्वात अनेक विक्रमांची नोंद आहे. सचिनला अनेक पुरस्कारांनी आत्तापर्यंत सन्मानित केले गेले आहे. आता त्याला २१ व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून निवडण्यात आले आहे.
सचिनने विश्वाक्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहे, त्याच्या नावावर सर्वाधिक १०० शतकांची नोंद आहे. त्याने श्रीलंकेच्या यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकाराला पराभूत करून २१ व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजाचा मान मिळवला आहे.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने स्टार स्पोर्ट्स चॅनेलने एक मतदान चालू केले होते, ज्यात कोण आहे २१ व्या शतकातील सर्वोत्तम फलंदाज असे विचारले होते. यावेळी चॅनलच्या समालोटनाच्या टीम आणि चाहत्यांनी सचिनला सर्वोत्तम फलंदाज म्हणून निवडले.
भारताचा महान फलंदाज सुनील गावसकर यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “हा एक कठीण सामना होता. कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर दोघेही खेळाचे प्रतीक आहेत. पण २१ व्या शतकाच्या महान कसोटी फलंदाजाचा विजेता माझा सहकारी मुंबईकर सचिन रमेश तेंडुलकर आहे.”
सचिनने वयाच्या १६ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ५१ शतकांसह १५,९२१ धावा केल्या आहेत. तर संगकाराच्या कसोटीत १२,४०० धावा नावावर आहेत तर त्याच्या नावावर ३८ कसोटी शतके आहेत. समालोचन समितीत व्हीव्हीएस लक्ष्मण, इरफान पठाण, आकाश चोप्रा आदींचा समावेश होता. समालोचन समितीमध्ये समाविष्ट असलेल्या माजी भारतीय क्रिकेटपटूंनी सचिनच्या योगदानाचे कौतुक करीत त्याची निवड केली.
सचिनने भारतीय क्रिकेटमध्ये खूप योगदान दिले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर ४९ शतकांची नोंद आहे. तसेच त्याचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम आतापर्यंत कोणीच तोडू शकलेलं नाही आहे. त्यानी भारतीय संघासोबत २०११ चा विश्वचषकही जिंकला होता. भारतीय अनेक युवा खेळाडू सचिनला त्यांचा आदर्श मानतात.
महत्वाच्या बातम्या
सोने दो मुझे… सेहवागने विलियम्सनच्या संथ फलंदाजीची उडवली खिल्ली, पाहून व्हाल लोटपोट
जेव्हा राखीव दिवशीही पावसाने केली होती फलंदाजी, भारताला संयुक्त जेतेपदावर मानावे लागले समाधान
लाईव्ह सामन्यात दर्शक देत होते न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना शिव्या, तपास लागताच काढलं स्टेडियमबाहेर