भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या आपल्या कुटुंबासमवेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मागील काही दिवसांपासून सचिन वारंवार आपल्या कुटुंबासोबत सुट्ट्या साजरा करत असलेल फोटो अथवा व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर करतोय. गुरुवारी (१० डिसेंबर) सचिनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मुलगी सारासमवेत एक फोटो पोस्ट केला आहे. ज्याला सचिनने एक मजेशीर कॅप्शनदेखील दिलेले दिसून येते.
सुट्ट्यांचा आनंद घेत आहे सचिन
जागतिक क्रिकेटमधील सर्वात आदरणीय खेळाडूंपैकी एक असलेला सचिन सध्या आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. कोरोना महामारीनंतर तेंडुलकर कुटुंब सुट्ट्यांचा आस्वाद घेतोय. सचिनने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून मुलगी सारा सोबत एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोखाली कॅप्शन देताना सचिनने लिहिले की, ‘सारा : बाबा आपण समुद्रात हरवलो आहोत? मी : आय एम नॉट शोर’
यासोबतच त्याखाली एक हसण्याचा ईमोजी सचिनने टाकला आहे. हॅशटॅग वापरून वेकेशन असेदेखील सचिन म्हणाला आहे.
https://www.instagram.com/p/CInjGUzMFHp/?utm_source=ig_web_copy_link
काही दिवसांपूर्वी आले होते सुट्ट्यांचे व्हिडिओ
काही दिवसांपूर्वी सचिनने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून पॅरासिलींग करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याखाली त्याने हम तो उड गये! असे कॅप्शन लिहिले होते.
https://www.instagram.com/p/CIf10F1g06Z/?utm_source=ig_web_copy_link
तसेच, बॉलीवूड चित्रपटातील ‘दिल चाहता है’ हे गाणे टाकून त्याने सायकलिंग करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.
https://www.instagram.com/p/CIN6jrAg7Bt/?utm_source=ig_web_copy_link
इतर वेळी ट्विटरवरून व्यक्त होणारा सचिन आजकाल इंस्टाग्रामवरून चाहत्यांशी संवाद साधत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात