---Advertisement---

तब्बल ८ वर्षांनी सचिननी ओपन केली होती ती खास शाॅंपेन, कारणही होते तसेच खास

On: शनिवार, एप्रिल 25, 2020 12:26 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूला अनेकदा मोबाईल, मोटारसायकल, शँपेनची बॉटल असे एखादे खास बक्षीस दिले जाते. असेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कसोटीमध्ये सर्वात पहिल्यांदा जेव्हा १९९० ला मँचेस्टर येथे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात सामानावीर पुरस्कार मिळाला होता, तेव्हा मॅगनम शँपेनची बॉटल बक्षीस म्हणून मिळाली होती.

ही बॉटल सचिनने तब्बल ८ वर्षे जपून ठेवली होती. त्याने ही शँपेनची बॉटल १९९८ ला उघडली. त्याने त्याची मुलगी साराच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने १९९८ ला पहिल्यांदा या बॉटलवरील कॉर्क काढले होते. साराचा २२ ऑक्टोबरला वाढदिवस असतो.

मास्टर ब्लास्टर सचिनने त्याच्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत अनेकदा मोठ्या खेळी करत भारताला विजय मिळवून दिले आहेत. त्यासाठी त्याला अनेकदा सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात देखील आले आहे.

सचिन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे. त्याला ७६ वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. यातील १४ वेळा त्याला कसोटी सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर वनडेत त्याला ६२ वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. Sachin Tendulkar got Magnum champagne bottle as the prize for his first man of the match in a Test. He preserved it for eight years.

ट्रेंडिंग घडामोडी – 

गंभीरने केला आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेचा अंत्यसंस्कार; वाहिली श्रद्धांजली

रोहित शर्मासाठी हे आहेत सचिनबरोबर घालवलेले सर्वोत्तम ५ क्षण

सचिन-रहाणे पहिल्या भेटीसाठी रहाणेने पाहिली होती ७ तास वाट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---