भारतात हळूहळू विविध क्रीडा प्रकारातही मोठी प्रगती होताना दिसून येत आहे. अनेक खेळाडूंनी लहान वयातच मोठे यश पाहायला मिळाले आहे. यात बुद्धिबळपटू आर प्रज्ञानानंद (R. Praggnanandhaa) याचे नाव प्रामुख्याने येते. नुकतेच त्याने एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाईन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत मोठा विजय मिळवला, ज्यामुळे त्याचे भारतभरातून कौतुक होत आहे.
केवळ १६ वर्षांचा असलेल्या प्रज्ञानानंदने सोमवारी (२१ फेब्रुवारी) विश्वविजेता आणि जागतिक अव्वल क्रमांकावरील बुद्धिबळपटू असलेल्या मॅग्नस कार्लसनला (Magnus Carlsen) पराभूत केले. त्यामुळे तो असा तिसराच भारतीय बुद्धिबळपटू बनला, ज्याने नॉर्वेच्या कार्लसनला पराभूत केले आहे. यापूर्वी विश्वनाथन आनंद आणि पेंटाला हरिकृष्णा यांनी असा पराक्रम केला होता. पण यांच्यात प्रज्ञानानंद सर्वात लहान आहे. त्याचमुळे त्याचे सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
भारताचा पाच वेळचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने ट्वीट करत प्रज्ञानानंदचे कौतुक केले आहे.
https://twitter.com/vishy64theking/status/1495750946873573376
इतकंच नाही तर भारताचा महान फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) देखील प्रज्ञानंदाचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले की, ‘प्रज्ञासाठी हा किती शानदार अनुभव असेल. तुझ्या भविष्यातील दिर्घ आणि यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा. तू भारताला गौरवान्वित केले आहे.’
https://twitter.com/sachin_rt/status/1495759508177571843
सचिनव्यतिरिक्त भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) देखील प्रज्ञानानंदच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. त्याने लिहिले की, ‘मॅग्नस कार्लसनला पराभूत करून प्रज्ञाने जो पराक्रम केलाय, त्याबद्दल संपूर्ण देशाला अभिमान आहे.’
https://twitter.com/ashwinravi99/status/1496015483799502848
याशिवाय देखील अनेकांनी प्रज्ञानानंदचे कौतुक केले आहे. बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केले की, ‘या युवा खेळाडूकडून येथे शिकायला मिळते की, जेव्हा आपण आपल्या कामाचा आणि आपल्या आव्हानांचा आनंद घेतो, तेव्हाच आपण आपली पूर्ण क्षमता साध्य करू शकतो.’

प्रज्ञानानंदचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता. तो २०१६ मध्ये वयाच्या १० व्या वर्षी सर्वात युवा आंतरराष्ट्रीय मास्टर बनला होता. त्याने कार्लसनविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर आनंद व्यक्त केला. तसेच हा विजय त्याला भविष्यातही प्रेरणादायी ठरेल असे तो म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदही आनंद गडे! ३ महिन्यांनंतर अष्टपैलू जडेजाचे भारतीय संघात पुनरागमन, टी२० मालिकेसाठी आहे उत्साहित
‘दीर्घ श्वास घे आणि त्या पत्रकाराचे नाव सांग’, सेहवागचा वृद्धिमान साहाला सल्ला
‘बुमराहदेखील आहे, त्याला विसरू नका’, गावसकरांची भारतीय वेगवान आक्रमणाबद्दल मोठी प्रतिक्रिया






