---Advertisement---

दैदीप्यमान कारकीर्द असूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आहे ‘ही’ खंत

On: रविवार, मे 30, 2021 7:11 PM
---Advertisement---

भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कारकीर्द दैदीप्यमान म्हणावी, अशीच राहिली. आपल्या कारकिर्दीत त्याने फलंदाजीतील कैक विक्रम आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, सर्वाधिक अर्धशतके असे अनेक विक्रम आजही सचिनच्या नावे आहेत. इतकेच नाही तर १०० आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.

मात्र अशी शानदार कारकीर्द असून देखील सचिनला दोन गोष्टींबाबत अजूनही खंत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने या दोन बाबींचा उल्लेख केला.

‘या’ गोष्टींची आहे खंत
दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टींचा खुलासा केला. त्याने या मुलाखतीत आपल्या संपूर्ण कारकिर्दीत भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर आणि वेस्ट इंडिजचे माजी स्फोटक फलंदाज सर व्हिवियन रिचर्ड्स यांच्यासह कधीही न खेळता आल्याचे दुःख असल्याचे विधान केले. तो म्हणाला, “मला दोन गोष्टींची खंत आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी सुनील गावसकरांसह कधीच खेळू शकलो नाही. मिस्टर गावसकर माझे हिरो होते. त्यांना पाहूनच मी मोठा झालो. पण त्यांच्यासह कधीच खेळता न आल्याचे दुःख मला नेहमीच राहील. माझ्या पदार्पणाच्या काही वर्षे पूर्वीच त्यांनी निवृत्ती घेतली होती.”

या व्यतिरिक्त वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज सर व्हिवियन रिचर्ड्स यांच्यासह देखील कधीच न खेळता आल्याबद्दल सचिनने वाईट वाटत असल्याचे सांगितले. “मला दुसरी खंत ही आहे की माझे बालपणीचे दुसरे हिरो व्हिवियन रिचर्ड्स यांच्यासह देखील कधीच खेळता आले नाही. पण मी कौंटी क्रिकेटमध्ये त्यांच्याविरुद्ध खेळलो आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्याविरुद्ध न खेळता आल्याचे मला दुःख आहे”, असे यावेळी सचिन म्हणाला. व्हिवियन रिचर्ड्स यांनी १९९१ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर सचिनने १९९० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र या दरम्यान एकदाही त्यांना एकमेकांविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

“काही क्षण तुमच्याबरोबर कायम राहतात”, सौरव गांगुली ‘तो’ जुना फोटो शेअर करत झाला भावूक

विराट कोहलीने ‘कॅप्टन कूल’ धोनीबरोबरच्या नात्याचे केवळ ‘या’ दोन शब्दात केले वर्णन

रवींद्र जडेजाने उलगडला संघाबाहेर असतांनाचा अनुभव, ‘या’ गोष्टीचा सतत करायचा विचार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---