मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो नेहमीच टीम इंडिया आणि इतर उदयोन्मुख खेळाडूंचं मनोबल वाढवत असतो. सचिन सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंवर प्रतिक्रिया देण्यास मागेपुढे पाहत नाही. आता त्यानं एका मुलीच्या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिननं या मुलीच्या गोलंदाजीचं कौतुक करत तिला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका युजरनं या मुलीचा गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, “या मुलीला पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोलंदाजाची ॲक्शन आठवते? यावर सचिननं प्रतिक्रिया दिली, “ही ॲक्शन पाहून मला झुलन गोस्वामीची आठवण येते. किती अप्रतिम गोलंदाजी! मला आशा आहे की या मुलीचं करिअरही तिच्यासारखंच (झुलन) चांगलं होईल. शुभेच्छा!” सचिनच्या या पोस्टवर चाहत्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत. कोणी “अमेझिंग बॉलिंग ॲक्शन” म्हणतंय तर कोणी मुलीला शुभेच्छा देत आहे.
Reminds me of @JhulanG10. What a bowling hero to have!
Hope your career is as good as hers. Best wishes! 😊 https://t.co/jdTXRkQXBK
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 17, 2024
भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी बद्दल बोलायचं झालं तर, झुलननं 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आपल्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तिनं अनेक विक्रम रचले. झुलननं भारतीय महिला क्रिकेट संघासाठी 284 सामने खेळले आहेत. तिनं 12 कसोटी सामन्यात 44 आणि 204 एकदिवसीय सामन्यात 255 बळी घेतले आहेत.
झुलन गोस्वामी महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. याशिवाय तिनं 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 56 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 पेक्षा जास्त षटकं टाकणारी ती एकमेव गोलंदाज आहे. तसेच तिच्या बॅटमधून 1924 आंतरराष्ट्रीय धावाही निघाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘थाला’ पुढचं आयपीएल खेळणार की नाही? ‘चिन्नाथाला’नं एकाच शब्दात उत्तर दिलं, म्हणाला…
मिचेल स्टार्कच्या खराब कामगिरीवर भडकला इरफान पठाण; म्हणाला, “सर्वात महाग खेळाडू…”
आधी राजस्थानविरुद्ध पराभव अन् आता लाखोंचा दंड, श्रेयस अय्यरला बसला दुहेरी झटका!