जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडूलकर सध्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्स मेंटर आहे. त्याचे भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मुंबईतील ३१५ नंबरच्या बसचा उल्लेख करताना दिसत आहे.
त्याने सांगितले आहे की, तो याच बसमध्ये बसून शिवाजी पार्कला जात आणि याच बसमधून ट्रेनिंग सेशननंतर घरी जात. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
सचिनने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लहाणपनीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तो व्हिडीओमध्ये बसजवळ उभा आहे, ज्याचा बस क्रमांक ३१५ आहे. तो म्हणाला, “कित्येक वर्षानंतर मी ३१५ क्रमांकाची बस पाहिली आहे. ही बांद्रा आणि शिवाजी पार्क यांच्यादरम्यान चालायची. मी या बसमधूनच सर्व प्रवास करायचो आणि शिवाज पार्कला जाऊन प्रशिक्षण घेण्यासाठी खूप उत्सुक असायचो. जेव्हा सराव करुन आणि अनेक सामने खेळून थकून जायचो, तेव्हा मी माझ्या आवडत्या सीटवर बसून घरी जायचो. त्या सीटच्या खिडकीवर डोके ठेऊन कधी कधी झोपून जायचो.”
https://www.instagram.com/reel/CcFubX9g5B0/?utm_source=ig_embed&ig_rid=361b66fb-988d-487c-aa2d-cc73c01abc6d
त्याने त्याची आवडती जागा देखील या व्हिडीओत दाखवली आहे. शेवटच्या सीटवर बसून तो प्रवास करायचा. तो म्हणाला की, “माझी एवढीच इच्छा असायची की ती सीट माझ्यासाठी मोकळी असावी. कारण मला तेथे बसायला मिळावे आणि बाहेरील थंड हवेचा आनंद घेता यावा. तेव्हा मी झोपून जायचो आणि कधी कधी तर मी माझा बस स्टाॅप पण विसरुन जायचो, परंतु हे सगळ खुप मजेशीर होतं.”
सचिन भारतीय संघाचा माजी कर्णधार असून त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० शतके ठोकली आहेत. तसेच तो एकदिवसीय आणि कसोटी प्रकारामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी शानदार कामगिरी केली आहे. अनेक दिग्गज खेळाडू त्याला आदर्श मानतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याने हलवाईच्या दुकानात बसले पाहिजे, आता त्याला बॅटिंग…’, बाद होताच मयंक चाहत्यांच्या निशाण्यावर
IPL 2022| हैदराबाद की चेन्नई कोण मिळवणार पहिला विजय? सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही