---Advertisement---

‘कारकिर्दीची १०-१२ वर्षे तणावात गेली, अनेक रात्री जागून काढल्या,’ सचिनचा धक्कादायक खुलासा

On: सोमवार, मे 17, 2021 9:03 AM
---Advertisement---

भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आपल्या दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक यशाची शिखरे संपादन केली होती. परंतु मास्टर ब्लास्टरसाठी हा प्रवास सोपा नव्हता. नुकताच सचिन यांनी आपल्या कारकीर्दीविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. सचिन यांनी आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीचा एक मोठा भाग तणावात असताना व्यतीत केल्याचे सांगितले आहे. पुझे त्यांना समजले की सामन्याआधीचा हा तणाव त्यांच्या तयारीचा एक महत्वपूर्ण भाग होता.

सचिन अनॲकेडमीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “कालांतराने मला जाणवले की खेळासाठी शारीरिक तयारी करण्याबरोबरच स्वतःची मानसिक तयारी देखील करावी लागेल. मी प्रत्यक्षात मैदानात उरण्यापूर्वी माझ्या मनात सामना खूप आधीच सुरू व्हायचा. तेव्हा तणावाची पातळी खूप जास्त असायची.”

सचिन पुढे म्हणाले, “मला 10-12 वर्षे ताणतणावाचा सामना करावा लागला. सामन्यापूर्वी बर्‍याच वेळा मला रात्री झोप लागत नसायची. नंतर मी हे मान्य केले की हा माझ्या तयारीचाच एक भाग आहे. वेळेसह मी हे मान्य केले की मला रात्री झोपताना त्रास होत राहिल. मी माझ्या मनाला उत्तम ठेवण्यासाठी काहीतरी वेगळं करायचो.”

सचिन यांनी सांगितलं की या दुसर्‍या काही गोष्टीमध्ये फलंदाजीचा सराव, टीव्ही पाहणे आणि व्हिडिओ गेम खेळणे तसेच सकाळचा चहा बनविणे या कामांचा समावेश आहे.

सचिन म्हणाले, “सामन्यापूर्वी मी चहा बनवून, कपड्यांना इस्त्री करुन स्वत:ला सामन्यासाठी तयार करायचो. माझ्या भावाने मला हे सर्व शिकवले होते. मी सामन्याच्या एक दिवस आधीच माझी बॅग तयार करायचो आणि ही माझी सवयच झाली. भारतासाठी माझ्या शेवटच्या सामन्यातही मी असे केले होते.”

महत्त्वाच्या बातम्या-

“मी आयुष्यभर तर क्रिकेट खेळणार, त्यामुळे युवकांना…,” भारताचा अनुभवी गोलंदाज शमीचे मोठे भाष्य

भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत १००हून अधिक विकेट्स घेणारा एकमात्र जाबाज, ‘हे’ आहे नाव

मोठी बातमी! इंग्लंडला जबरदस्त धक्का, ‘या’ महत्त्वाच्या कसोटी मालिकेतून जोफ्रा आर्चर बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---