भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा गेल्या काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारतीय संघाला न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. यापूर्वी मोहम्मद शमीने आपल्या पुढील कारकिर्दीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे
मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्याच कसोटी सामन्यात गोलंदाजी करत असताना हाताला चेंडू लागला होता. त्यामुळे या मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली होती. आता त्याने गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरीच वर्षे खेळल्यानंतर मला त्याबद्दल जाणून घेण्यास आवड असलेल्या तरुणांना माझे अनुभव सांगण्याची इच्छा आहे. मला माहित आहे की, मी आयुष्यभर क्रिकेट खेळताना दिसणार नाही. कदाचित एक-दोन वर्षे किंवा पुढचा विश्वचषक होईपर्यंत. पण त्याआधी मी तरुणांना काहीतरी देईल असे मला वाटते. हे माझ्यासाठी उत्तम असेल.”
येणाऱ्या काळात तुझी काय भूमिका असणार आहे? असा प्रश्न केला असता मोहम्मद शमी म्हणाला की, “बर्याच योजना आखण्यात काही अर्थ नाही. कारण काही गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली नसतात. कोणी असा विचार तरी केला होता का, कोरोना आपले २ वर्ष वाया घालवेल. म्हणून मी एकावेळी एक मालिका किंवा एक स्पर्धा यावर लक्ष केंद्रित करत आहे. आम्ही नुकताच एक संघ म्हणून उल्लेखनीय क्रिकेट खेळलो आहे आणि इंग्लंड दौर्यापूर्वी नक्कीच आमचे मनोबल उंचावले आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “हे आपोआप होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरीच वर्षे राहून मला तरुणांना युक्त्या शिकवण्यास आवडेल. मी नेहमी खेळणार नाही, म्हणून मी जर तरुणांना युक्त्या शिकवल्या तर चांगले होईल. माझी वृत्ती कशी असेल याबद्दल मी फारसा विचार करत नाही. मी आयपीएलमध्ये माझी लय गाठली आहे आणि उर्वरित सर्व गोष्टी परिस्थितीवर अवलंबून आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत १००हून अधिक विकेट्स घेणारा एकमात्र जाबाज, ‘हे’ आहे नाव
धोनीच्या पहिल्या क्रशचे नाव माहित आहे का? बायकोला सांगू नको असं म्हणत त्यानेच केलाय खुलासा
धोनीने अवघ्या सातव्या सामन्यात उंचावलेलली आयसीसी ट्रॉफी, तर विराट ‘इतके’ सामने खेळून अजून प्रतिक्षेत