---Advertisement---

‘त्या’ चौघांच्या सागंण्यावरुन युवा कोहलीने अचानक धरले होते सचिनचे पाय, वाचा तो किस्सा

On: सोमवार, मे 17, 2021 12:49 PM
Sachin Tendulkar, Virat Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने २००८ मध्ये आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोहलीने जेव्हा संघात प्रवेश केला होता. त्यावेळी संघात सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवाग सारखे दिग्गज फलंदाज होते. ज्यावेळी विराटने या दिग्गजांच्या ड्रेसिंग रूममध्ये पहिल्यांदा प्रवेश केला होता. त्यावेळी त्याच्यासोबत एक अविस्मरणीय किस्सा घडला होता, जो स्वतः सचिनने सांगितला आहे.

ही गोष्ट २००८ ची आहे, जेव्हा विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारतीय संघात निवड होणे ही प्रत्येक क्रिकेटपटूसाठी खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे विराट कोहलीलाही दोन दिवस झोप लागली नव्हती. तो सचिन तेंडुलकरला भेटण्यासाठी खूप उत्सुक होता. याची भनक संघातील दिग्गज खेळाडूंना लागली होती. त्यावेळी दिग्गज खेळाडूंनी विराट कोहलीची पायखेची करायचे ठरवले होते.

युवराज सिंग आपल्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखला जातो. त्याला हरभजन सिंग, इरफान पठाण आणि मुनाफ पटेल यांची साथ मिळाली होती. या चौघांनी मिळून विराट कोहलीला म्हटले होते की, “ड्रेसिंग रूममध्ये तुला सचिन पाजी दिसतील, त्याचक्षणी तू त्यांचे चरण स्पर्श कर. ही आमची परंपरा आहे. हे आम्ही देखील केले होते. आता तूही तेच कर.

युवा विराट कोहलीला या गोष्टीची भनक देखील नव्हती की, कोणी आपली अशी मस्करी करू शकतो. त्यामुळे त्याला वाटले होते की, ही खरंच परंपरा आहे. विराट सचिन तेंडुलकरला भेटण्यासाठी खूप उत्सुक होता.

पुढील गोष्ट सचिन तेंडुलकरने स्वतः सांगितली. त्याने म्हटले की, “कोहलीने जेव्हा अचानक माझे चरण स्पर्श केले, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो आणि काय होत आहे याचा विचार करण्यास सुरुवात केली. मी त्याला विचारले तू काय करत आहेस? आणि त्याला सांगितले की याची काही गरज नाही. ही भारतीय संघाची परंपरा नाही. मग तो उठला आणि त्यानंतर आम्ही आमच्या मागे ४ खोडकर खेळाडूंना जोरजोरात हसताना पहिले होते.” हा किस्सा विराट कोहलीच्या अजूनही लक्षात असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

रायुडूच्या थ्रीडी ट्विटबद्दल तब्बल २ वर्षांनी विजय शंकरने सोडले मौन; म्हणाला, “मी काहीच चुकीचं केलं नव्हतं”

Video: हेलिकॉप्टर कोसळलं! इंग्लिश फलंदाज खेळायला गेला धोनी फेम हेलिकॉप्टर शॉट अन् पडला तोंडघशी

“तुम्ही माझ्याकडेही बोट दाखवू शकता,” चेंडू छेडछाड प्रकरणी माजी ऑसी गोलंदाजी प्रशिक्षकाचे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---