---Advertisement---

“तुम्ही माझ्याकडेही बोट दाखवू शकता,” चेंडू छेडछाड प्रकरणी माजी ऑसी गोलंदाजी प्रशिक्षकाचे वक्तव्य

On: सोमवार, मे 17, 2021 10:35 AM
---Advertisement---

सन २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेले बॉल टेम्परिंग प्रकरण चांगलेच गाजलेले. या प्रकरणी दोषी आढळलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व कॅमेरून बेनक्रॉफ्ट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात शिक्षा झालेल्या बेनक्रॉफ्टने जवळपास अडीच वर्षांनंतर याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. यावर आता ऑस्ट्रेलिया संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक डेविड सेकर यांनी आपले मत मांडले आहे.

डेविड सेकर यांनी रविवारी (१६ मे) सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “त्यावेळी नक्कीच बर्‍याच गोष्टी चुकीच्या घडल्या. याबाबतीत अनेकांनी टीका केली होती. बर्‍याच लोकांना दोष दिला जाऊ शकतो. मलाही दोष देता येईल. हे इतर कोणीही असू शकते. हे रोखता आले असते पण तसे झाले नाही, जे दुर्दैवी होते.”

“ही घटना नेहमी ऑस्ट्रेलियन क्रिकेटसोबत जोडलेली राहील. यात कोणीही काहीच करू शकत नाही. तुम्ही माझ्याकडे बोट दाखवू शकता. तुम्ही डेरेन लेहमेनवर बोट दाखवू शकता. आपण इतर लोकांकडेही बोट दाखवू शकता. निश्चितच तुम्ही असे करू शकता. हे दुर्दैव आहे की, ही गोष्ट सदैव आपल्या पाठीशी राहणार आहे. आम्हा सर्वांना माहीत आहे की, आम्ही खूप मोठी चूक केली आहे. परंतु हे सर्व समोर येईपर्यंत त्याचा परिणाम आम्हाला माहित नव्हता.” असे मत सेकर यांनी बेनक्राफ्टने केलेल्या खुलास्यानंतर मांडले आहे.

काय म्हणाला होता बेनक्राफ्ट
ऑस्ट्रेलियातील एका मुख्य वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत झालेली ती घटना दुर्देवी होती. याप्रकरणी आम्ही तिघे दोषी ठरलो. मात्र या प्रकरणाची कल्पना संघातील गोलंदाजांंना होती. मी जे केले त्याची जबाबदारी स्वत: घेतो. मी तेव्हा अधिक जागरूक असतो तर ही घटना टाळता आली असती.”

आपले म्हणणे पुढे नेताना बेनक्राफ्ट म्हणाला, “मी खूप दु:खी झालो होतो. मी एक असे काम केले, ज्यामुळे खेळाच्या मूल्यांना तडा गेला. मी या आघाडीवर सुधारणा करू इच्छितो. मी अद्याप एकही शतक झळकावले नाही. मात्र, मी ते पूर्ण करु शकलो असतो.” मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या बेनक्रॉफ्टने आतापर्यंत १० कसोटी सामने खेळताना ४४६ धावा बनविल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटी चॅम्पियनशीप फायनलपुर्वी टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, ‘हे’ प्रमुख खेळाडू अजूनही आहेत अनफिट

बुमराह किंवा शमी नव्हे तर ‘हा’ टी२० क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, विरेंद्र सेहवागने सांगितले नाव

‘कारकिर्दीची १०-१२ वर्षे तणावात गेली, अनेक रात्री जागून काढल्या,’ सचिनचा धक्कादायक खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---