येत्या 18 जूनपासून सुरू होणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथम्प्टन स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने 20 सदस्यीय संघाची घोषणा केलेली आहे. मात्र काही खेळाडूंच्या फिटनेसवर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. भारतीय संघातील एकूण 3 खेळाडूंवर फिटनेसमुळे टांगती तलवार आहे.
सलामीवीर केएल राहुल अपेंडिक्सच्या आजाराशी झगडत आहे आणि त्याला यापूर्वीच अनफिट घोषित केले गेले आहे. याशिवाय बीसीसीआयने स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत की, निवडलेल्या 20 खेळाडूंना आइसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. तसेच जर एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्यासाठी वेगळ्या चार्टर्ड फ्लाइटची कोणतीही व्यवस्था केली जाणार नाही. त्यामुळे त्या खेळाडूचे इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचे स्वप्न भंग पावेल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, वृद्धिमान साहा नुकताच दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. साहावर दिल्ली येथे उपचार सुरू आहेत. यासह राखीव खेळाडूंमध्ये निवडलेला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे. अशा परिस्थितीत या खेळाडूंखेरीज आणखी एक-दोन खेळाडू जर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंति सामन्यासाठी भारतीय संघासमोर बऱ्याच समस्या उद्भवू शकतील.
बीसीसीआयने इंग्लंड दौर्यावर जाणाऱ्या सर्व खेळाडूंना 19 मेपर्यंत कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल देण्यास सांगितले आहे. कोरोना चाचणीत निगेटिव्ह आलेल्या खेळाडूंना मुंबईत 10 दिवस कडक आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी 2 जून रोजी होईल. त्यावेळी कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर हे सर्व खेळाडू इंग्लंडला जाऊ शकतील.
बीसीसीआयच्या सल्लागारानुसार, या दौर्यावर जाणारे सर्व खेळाडू कोरोना लस घेत आहेत. विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, उमेश यादव व आर अश्विन यांनी आधीच लसीकरण केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराह किंवा शमी नव्हे तर ‘हा’ टी२० क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, विरेंद्र सेहवागने सांगितले नाव
“मी आयुष्यभर तर क्रिकेट खेळणार नाही, त्यामुळे युवकांना…,” भारताचा अनुभवी गोलंदाज शमीचे मोठे भाष्य
‘कारकिर्दीची १०-१२ वर्षे तणावात गेली, अनेक रात्री जागून काढल्या,’ सचिनचा धक्कादायक खुलासा