---Advertisement---

बुमराह किंवा शमी नव्हे तर ‘हा’ टी२० क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, विरेंद्र सेहवागने सांगितले नाव

On: सोमवार, मे 17, 2021 9:27 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीदेखील तो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असणारा सेहवाग नेहमीच काही-ना -काही शेअर करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अशातच सेहवागने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना माघारी धाडणाऱ्या एका गोलंदाजाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

यापूर्वी टी-२० क्रिकेट हे केवळ फलंदाजांसाठीच आहे असे म्हटले जायचे. परंतु काही गोलंदाजांनी आपल्या कौशल्याने हे सिद्ध करून दाखवले की, गोलंदाजी जर उत्तम असेल तर गोलंदाज देखील टी-२० क्रिकेटवर अधिराज्य गाजवू शकतात. अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानने हे सिद्ध करून दाखवले आहे. त्याच्या गोलंदाजीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जाते. अशातच सेहवाग देखील त्याच्या गोलंदाजीचा प्रशंसक झाला आहे. सेहवागने राशिद खानचे कौतुक करताना त्याला टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज घोषित केले आहे.

क्रिकबजशी बोलताना त्याने म्हटले की, “सध्या तो टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये, असा एकही फिरकी गोलंदाज नाहीये, जो त्याच्या आजूबाजूला असेल. त्याच्याकडे ती क्षमता आहे. तसेच ती दिवसेंदिवस आणखीच चांगली होत आहे.”

सेहवागने राशिद खानशिवाय पंजाब किंग्ज संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू शाहरुख खानचेही कौतुक केले. तसेच भविष्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याचे वर्णन केले.

आयपीएल स्पर्धेत राशिद खानची कामगिरी
आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्त्व करताना राशिद खानने ७ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६.१४ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या. इतकेच नव्हे तर त्याने १० गडी देखील बाद केले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आयपीएल २०२१ स्पर्धेत राशिद खानच्या गोलंदाजीवर कुठल्याही फलंदाजाला षटकार मारण्यात यश आले नाही. त्याने २०१७ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने आयपीएल कारकिर्दीत ६९ सामन्यात एकूण ८५ गडी बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कारकिर्दीची १०-१२ वर्षे तणावात गेली, अनेक रात्री जागून काढल्या,’ सचिनचा धक्कादायक खुलासा

“मी आयुष्यभर तर क्रिकेट खेळणार नाही, त्यामुळे युवकांना…,” भारताचा अनुभवी गोलंदाज शमीचे मोठे भाष्य

भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत १००हून अधिक विकेट्स घेणारा एकमात्र जाबाज, ‘हे’ आहे नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---