भारताचा चायनामन गोलंदाज कुलदिप यादवने काल (14 डिसेंबर) त्याचा 24वा वाढदिवस साजरा केला. यामुळे त्याच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याला एका अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सचिनने कुलदिपला ट्विटरवरून चिनी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यात त्याने चायनामन गोलंदाजाला चिनी भाषेतील शुभेच्छा असे म्हटले आहे.
A message in Chinese for A Chinaman bowler. 😜
生日快乐 Kuldeep Yadav!祝你未来有一个美好的一年
Happy birthday @imkuldeep18! Have a wonderful year ahead. pic.twitter.com/O1ffhKFwre— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 14, 2018
सचिनच्या या ट्विटला कुलदिपने उत्तर देत आभार मानले आहे.
Hehe🤣 Thank you so much Sir really appreciate it 🤗🙌🏻
— Kuldeep yadav (@imkuldeep18) December 14, 2018
कुलदिप सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात आहे. त्याने मर्यादित षटकांमध्ये उत्तम कामगिरी करत 33 वन-डे सामन्यात 67 विकेट्स तर 17 टी20 सामन्यात 33 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना जिंकत 1-0ने आघाडीवर आहे. तर पर्थ येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ फक्त एकच फिरकीपटू घेऊन खेळत आहे. हनुमा विहारी या अष्टपैलूला अंतिम अकरा जणांच्या संघात जागा मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारताला विश्वचषक जिंकून देणारे गॅरी कर्स्टन होणार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक?
–जेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय?
–मुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला