---Advertisement---

सचिनलाही एकेकाळी जाणवत होता मानसिक दबाव, जवळपास ‘इतकी’ वर्षे लागली नव्हती सामन्यापूर्वी शांत झोप

On: रविवार, जून 27, 2021 12:04 AM
---Advertisement---

मनुष्याच्या जीवनात शाररिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा हा हानिकारक असतो, अनेक लोकांना मानसिक दबावाचाही त्रास होतो. असेच आपल्याला क्रीडा क्षेत्रातही बघायला मिळते. आजच्या काळात मोठे खेळाडूही मानसिक त्रासातून अवस्थेतून जात असल्याचे खुलेपणाने सांगतात. आता खेळाडूंनी मानसिक दबावाविषयी उघडपणे व्यक्त होण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे मानसिक दबावाचा त्रास खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही झाला आहे. याबद्दल त्यानेच खुलासा केला आहे.

सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीत सांगितले की, सामन्याआधी तो रात्री झोपू शकत नव्हता आणि १० ते १२ वर्षे हे त्याच्या बाबतीत घडले. सचिनने तो सामन्याच्या आदल्या रात्री काय करायचा आणि ही परिस्थिती कशी हाताळली हे सांगितले.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, ‘माझ्या कारकीर्दीच्या १० ते १२ वर्षांच्या कालावधीत मला सामन्यापूर्वी झोप लागत नव्हती. मी पलंगावर झोपू शकत नव्हतो आणि झोपताना बाजू बदलत राहायचो. मी सामन्याबद्दल विचार करत राहायचो. एक दशकानंतर मला समजले की कदाचित मी अशाचप्रकारे सामन्यांसाठी तयार होतो. त्यानंतर मी त्या परिस्थितीवर लक्ष देणे थांबविले. सामन्यापूर्वी मी टीव्ही पाहत असे. सामन्यात चांगली कामगिरी करण्यास मला मदत करणारी सर्व कामे मी करत होतो.”

सचिन स्वतःला मानसिकरित्या करायचा तयार 
सचिन तेंडुलकरने सांगितले की सामन्यापूर्वी तो केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही तयारी करत असे. सचिन म्हणाला, “मी केवळ शारीरिकच नाही तर मानसिक तयारी देखील करायचो. मी मानसिकरित्या शांत राहण्याचा प्रयत्न करायचो आणि दुसर्‍या दिवशी कसा खेळणार याबद्दल विचार करायचो. मी पुढे काही वेळेत माझ्याबद्दल बरेच काही शिकलो. मी अशा परिस्थितींचा सामना करण्यास शिकलो, ज्याने मला खूप मदत केली.”

सचिन पुढे म्हणाला, “एक गोष्ट म्हणजे होती ती म्हणजे मी लोकांच्या अपेक्षांचा विचार केला पाहिजे की माझ्या स्वतःच्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे; पण मी माझ्या स्वत: च्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. कारण माझ्या मनात काय चालले आहे, हे लोकांना माहित नव्हते; मी कोणत्या दबावाखाली आहे. मी नेहमीच स्वत: ला चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहीत केले.”

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकण्याचा पराक्रम केला. सचिनने २०० कसोटी आणि ४६३ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले ज्यामध्ये त्याने 34 हजारांहून अधिक धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या

आयपीएल २०२१ उर्वरित हंगामापूर्वी युएई सरकारच्या ‘या’ नियमामुळे बीसीसीआय आणि फ्रँचायझींना मोठा फटका

कौतुकास्पद! गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ३ वर्षीय चिमुकलीच्या मदतीला धावले दोन भारतीय धुरंधर

अतरंगी बहिण-भाऊ! श्रेयस अय्यर लहान बहिणीबरोबर खेळतोय ‘हा’ अनोखा खेळ, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---