---Advertisement---

कौतुकास्पद! गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ३ वर्षीय चिमुकलीच्या मदतीला धावले दोन भारतीय धुरंधर

On: शनिवार, जून 26, 2021 5:50 PM
---Advertisement---

मोठमोठ्या सेलिब्रिटींनी आणि खेळाडूंनी अनेक वेळा गरजू व्यक्तींना मदत केली आहे. कोरोना काळात गरजू व्यक्तींसाठी अनेक क्रिकेटपटूनी फंड देखील गोळा केला होता. त्याचबरोबर सर्वांनी अडचणीच्या काळात एकत्र येण्याचा संदेश देखील दिला. त्याचबरोबर आता भारतीय संघाचे दोन खेळाडू एका गंभीर आजार असलेल्या लहान मुलीची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.

भारतीय संघाचे क्रिकेटपटू हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी तीन वर्षाच्या सानवीवर उपचार करण्यासाठी सर्वांना मदत करण्याची मागणी केली आहे. सानवी ‘स्पाइनल मस्कुलर एट्रोफी’ या गंभीर आजाराने पीडित आहे. या आजारावर उपचारासाठी सानवीला इंजेक्शनची गरज आहे आणि त्यासाठी 16 करोड रुपयांची आवश्यकता आहे.

हनुमा विहारीने या संदर्भात ट्विट केले होते की, ‘हे एक किंवा दोन लोकांच्या मदतीने नाही होऊ शकणार, यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. सानवीला एका इंजेक्शनची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून मदत करण्याची गरज आहे.’ अश्विन विहारीच्या ट्विटला रिट्विट करत अश्विन म्हणाला की, ‘चला जितके होईल तितके प्रयत्न करू आणि आपले महत्त्वाचे योगदान देऊ.’

हनुमा विहारीच्या अपीलनंतर सानवीसाठी मदतीचे हात पुढे येऊ लागले. या अपीलनंतर दोन तासांमध्ये जवळजवळ दोन लाख रुपये फंड जमा झाला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांनी देखील सानवीसाठी मदतीचा हात पुढे करत एक जीव वाचवण्यासाठी पुढे येण्याची सर्वांना विनंती केली.

काही महिन्याअगोदर भारतीय संघाचा कर्णधार आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने अयांश गुप्ता या लहान मुलाचा जीव वाचवला होता. अयांशला ‘जोल्गेन्स्मा’ या जगातील सर्वात महाग औषधाची गरज होती. अयांशच्या आई-वडिलांनी फंड एकत्रित करण्यासाठी ‘ अयांशफायटरएसएमए’ नावाने ट्विटर हँडल काढले. या ट्विटर हँडलच्या मदतीने त्याने सर्वांना सांगितले की, अयांशसाठी ते औषध मिळाले आहे. आणि यासाठी त्यांनी विराट आणि अनुष्काचे आभार देखील मानले.

महत्त्वाच्या बातम्या – 

अतरंगी बहिण-भाऊ! श्रेयस अय्यर लहान बहिणीबरोबर खेळतोय ‘हा’ अनोखा खेळ, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ तिघांचा समावेश झाला तर ‘मिशन इंग्लंड’ होणार फत्ते

धोक्याची घंटा! टी२० विश्वचषकासाठी त्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळणे कठीण, फिंचने दिला इशारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---