कोरोना महामारीमुळे लोकांच घराबाहेर पडण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. यामध्ये एथलीट्स, सेलिब्रिटी आणि वेगवेगळ्या खेळाच्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. लॉकडाऊन दरम्यान सेलिब्रिटी आणि खेळाडू सोशल मीडियावर बराच वेळ घालवत आहेत.
यादरम्यान, सेलिब्रिटी इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करताना दिसतात. यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या ऑफिसिअल इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून मांजरीबरोबर एक नवीन गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओला चाहतेही भरभरून प्रतिसाद देत आहेत. या व्हिडिओमध्ये मांजर सचिनच्या पायाशी चिकटून आपले प्रेम व्यक्त करीत आहे. सचिनही या मांजरीला भेटून खूप आनंदी दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना सचिनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “माझा नवीन मित्र परत आला आहे. असं वाटतंय की शेवटच्या भेटीचा वडा पाव मिस करत आहे.”
https://www.instagram.com/p/CFJjZanA2IG/
यापूर्वी सचिनने स्वयंपाकघरात वडा पाव बनवतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये ही मांजरही दिसली होती, ती लपवलेल्या डिशकडे पहात होती.
https://www.instagram.com/p/CEy_ueWMDaA/
सचिनला जगातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावणारा सचिन हा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने सर्वाधिक कसोटी आणि वनडे आंतरराष्ट्रीय धावा देखील केल्या आहेत.