महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी बॉलिंग करताना दिसत आहे. आश्चर्याचं म्हणजे, या मुलीची बॉलिंग ॲक्शन भारताचा दिग्गज गोलंदाज झहीर खान सारखी आहे! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही अनोखी मुलगी आहे तरी कोण? तर याचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो.
या मुलीचं नाव सुशीला मीना. सचिन तेंडुलकर तिच्या बॉलिंग ॲक्शननं खूपच प्रभावित झाला आहे. त्यानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून या मुलीचा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सचिननं झहीर खानलाही टॅग केलंय. हा लेख लिहेपर्यंत हा व्हिडिओ 90 लाखांहून अधिक वेळा पाहिल्या गेला असून त्याला 7 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. सचिन तेंडुलकरने व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलं, “सहज आणि पाहण्यास सुंदर! सुशीला मीनाच्या बॉलिंग ॲक्शनमध्ये झहीर खानच्या छटा आहेत.”
भारताचा दिग्गज गोलंदाज झहीर खान डाव्या हातानं वेगवान गोलंदाजी करायचा. सुशीला देखील डावखुरी वेगवान गोलंदाज आहे. सचिननं हा व्हिडिओ शेअर करताच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चाहते सुशीलाचं खूप कौतुक करत आहेत. एका चाहत्यानं तर म्हटलं की, “भारतातील प्रत्येक गल्ली क्रिकेट टॅलेंटनं भरलेली आहे.” तुम्ही या मुलीचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
View this post on Instagram
सोशल मीडियावरील माहितीनुसार, सुशीला मीना राजस्थानच्या प्रतापगड भागात राहते. सुशीलाचे क्रिकेटशी संबंधित इतर व्हिडिओ ‘aamliya_ishwar’ या अकाउंटवर उपलब्ध आहेत. सुशीला अनेकदा शाळांमधील क्रिकेट सामन्यांमध्ये खेळताना दिसते.
जर आपण भारतीय दिग्गज झहीर खानबद्दल बोललो तर, तो एक ‘स्विंग मास्टर’ म्हणून ओळखला जात होता. झहीर चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्यास सक्षम होता. त्यानं आपल्या 309 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 610 विकेट घेतल्या. कपिल देव यांच्यानंतर भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज आहे.
हेही वाचा –
या दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीची नवी तारीख समोर
मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत चिंता, बंगालच्या या निर्णयामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली
आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडिया! जेतेपदासाठी या खतरनाक संघाशी लढत