---Advertisement---

अर्जुनच्या पदार्पणानंतर सचिनची भावनिक पोस्ट! मनातील भावना व्यक्त करताना लिहिले, ‘तुझा बाबा म्हणून…’

On: रविवार, एप्रिल 16, 2023 10:45 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 चा 22 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. पहिल्या दोन पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतत मुंबईने 5 विकेट्सने ‌सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यात मुंबईसाठी भारतात सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएल पदार्पण केले. त्यानंतर सचिन याने त्याच्यासाठी खास सोशल मीडिया पोस्ट केली.

तब्बल तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अर्जुन याला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली. कर्णधार रोहित शर्मा याने त्याला त्याची कॅप दिली. अर्जुनने सामन्यातील पहिले षटक टाकताना केवळ 5 धावा दिल्या. त्याने सामन्यात केवळ दोन षटके टाकताना 17 धावा केल्या. या पहिल्या सामन्यानंतर सचिनने आपल्या मुलासाठी खास सोशल मीडिया पोस्ट केली. त्याने लिहिले,

https://www.instagram.com/p/CrGnSQvsN1B/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

‘अर्जुन आज तू आयुष्यातील एक महत्त्वाचे पाऊल टाकले. तुझा बाबा आणि या खेळावर निस्सीम श्रद्धा असलेला व्यक्ती म्हणून सांगू इच्छितो की तू खेळाचा सन्मान केला की तुला परतावा म्हणून यश आणि लोकांचे प्रेम मिळेल. इथपर्यंत येण्यासाठी तू खूप मेहनत घेतली आहे. तू अजून मेहनत घेशील. ही एक नवी सुरुवात आहे. तुला शुभेच्छा.’

अर्जुन हा डाव्या हाताचा मध्यमगती वेगवान गोलंदाज तसेच आक्रमक फटकेबाज म्हणून ओळखला जातो. अर्जुनला 2021 मध्ये मुंबईने सुरुवातीला 20 लाख रुपयांच्या किमतीत आपल्या संघात सामील करून घेतले होते. त्यानंतर ‌‌‌‌2022 आयपीएल लिलावात पुन्हा मुंबईने त्याच्यावर ‌‌40 लाखांची बोली लावली. मात्र, या दोन्ही हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. या हंगामातील पहिल्या तीन सामन्यात देखील तो बाकावर राहिलेला.

(Sachin Tendulkar Social Media Post After Arjun Tendulkar IPL Debute For Mumbai Indians)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

याला म्हणतात दरारा! 2013 पासून मुंबई इंडियन्सने वानखेडे ठेवलेय अजिंक्य 
“यशाचे क्रेडिट घेतो तशी पराभवाची जबाबदारी घे”, दिल्लीच्या पराभवानंतर पॉंटिंगवर दिग्गजाचे शरसंधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---