शनिवारी, 15 ऑगस्ट 2020 रोजी आयडीबीआय फेडरल फ्यूचर फियरलेस मॅरेथॉन स्पर्धेला क्रिकेटर सचिन तेंडुलकर हिरवा झेंडा दाखवणार आहे. कोविड 19 या साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी तसेच भारताच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड 19 च्या संकटातून प्रत्येक भारतीय बाहेर येऊन त्यांच्यात सकारात्मकता निर्माण व्हावी हेच या मॅरेथॉनचे उद्दीष्ट आहे.
प्रत्येकाचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेहमीच चांगले राहिले पाहिजे किंबहुना आजही ती चांगली आहे. या काळातही उत्साही धावपटूंनी आयडीबीआय फेडरल फ्यूचर फियरलेस मॅरेथॉनसाठी नोंदणी केलेले पाहून मला आश्चर्य वाटते, असे आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे ब्रँड अॅम्बेसेडर सचिन तेंडुलकर म्हणाला. धावपटूंनी काळजी घेत आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच, लॉकडाऊनच्या सूचनांचे पालन केले पाहिजे, असे म्हणत सचिनने धावपटूंना शुभेच्छा दिल्या.
एनईबी स्पोर्ट्स आयोजित मॅरेथॉनसाठी 6 हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली आहे. ही मॅरेथॉन चार प्रकारात होणार असून पूर्ण मॅरेथॉन 42.2 किलोमीटर, अर्ध मॅरेथॉन 21.1 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर असणार आहे.
जगभरातील धावपटू, तो किंवा ती प्रत्येकाला प्रमाणपत्रांकरिता पात्र होण्यासाठी स्वतःच्या शहरात उपलब्ध ट्रॅकिंग अॅप्सवर त्यांचे अंतर आणि वेळांचे निरीक्षण करणे आवश्यक असून ते पाठविणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पूर्ण मॅरेथॉनची धावपट्टी भगव्या रंगाची, अर्ध मॅरेथॉनची धावपट्टी हिरव्या रंगाची, 10 किलोमीटरची धावपट्टी पांढऱ्या रंगाची तर 5 किलोमीटरची धावपट्टी निळ्या रंगाची असणार आहे.
कोविड 19 च्या संकटकाळात चिंता आणि तणाव असूनही बरीच सकारात्मकताही निर्माण झाली आहे. नागरिक स्वास्थ्य आणि आरोग्याबाबत अधिक जागरूक झाल्याने देशातील फिटनेस गुणांक निश्चितच सुधारला आहे असे दिसून येते. आमच्या आयडीबीआय फेडरल फ्यूचर फियरलेस मॅरेथॉनच्या माध्यमातून आम्हाला आशेचा संदेश पोहोचवायचा असून सकारात्मकतेसह, आशावाद आणि आत्मविश्वासाने लोकांना भविष्याकडे पाहण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे, असे आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ विग्नेश शहाणे यांनी सांगितले. कोविड 19 च्या संकटकाळात या मॅरेथॉनद्वारे लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये ‘रन टू मून’ उपक्रमातून प्रशिक्षक आणि क्रीडा सहाय्य करणार्या कर्मचार्यांसाठी 1 लाख रुपयांचा निधी उभा केला. या उपक्रमांतर्गत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये भारत मोठ्या प्रमाणात सहभागी होईल, असा विश्वास शहाणे यांनी व्यक्त केला.
एनईबी स्पोर्ट्सचे सीएमडी नागराज अदीगा म्हणाले, “या साथीच्या आजारा दरम्यान संपूर्ण भारत आणि इतर देशांकडून धावणाऱ्या स्पर्धकांना या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेताना पाहून खूप आनंद होत आहे. रन टू मून आणि फोरनाइट रनच्या यशानंतर आम्ही आता स्वातंत्र्यदिनी आयोजित आयडीबीआय फेडरल फ्यूचर फियरलेस मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करतो. प्रत्येकजण मान्सून मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचा आनंद घेतो आणि आम्ही आशा करतो की धावपटू स्वत: चे आव्हान पूर्ण करून लक्ष्य पूर्ण करतील”.
नेहमीप्रमाणे, मॅरेथॉनचे उद्दिष्ट ऑस्कर फाऊंडेशन (कमी उत्पन्न असणाऱ्या मुलांसाठी), गुंज (ग्रामीण गोरगरीबांसाठी असणाऱ्या अनेक सेवाभावी कार्यकर्ते) आणि गाइडस्टार इंडिया (एक ऑनलाइन एनजीओ) यासाठी निधी उभारणे हे आहे.