भारतीय संघाने २०१३ पासून एकही आयसीसी चषक जिंकला नाही. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाने आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत किंवा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. परंतु त्यांना विजेतेपद मिळवण्यात यश आले नाही. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही असेच काही घडले. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने २ वर्षांचा खडतर प्रवास पार करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. परंतु प्रतिस्पर्धी न्यूझीलंडने ८ विकेट्सने भारताला पराभूत करत पुन्हा त्यांची आयसीसी चषकाची प्रतिक्षा लांबवली.
या पराभवानंतर भारतीय संघाच्या काही निर्णयांवर आणि खेळाडूंच्या सामन्यांतील प्रदर्शनावर टिका केली जात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यानेही भारतीय संघाच्या चूका शोधून काढल्या आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिनने या सामन्यानंतर ट्विटरवर लिहिले की, “जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१ जिंकल्याबद्दल न्यूझीलंड क्रिकेट संघाचे अभिनंदन. आपण एक उत्कृष्ट संघ आहात. भारतीय संघ त्यांच्या प्रदर्शनामुळे नक्कीच निराश असेल. मी म्हटल्याप्रमाणे पहिली १० षटके खूप महत्वाची ठरली. भारताने दुसऱ्या डावात तर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनाही केवळ १० चेंडूंतच गमावले, त्यामुळे संघावर खूप दबाव निर्माण झाला.”
Congrats @BLACKCAPS on winning the #WTC21. You were the superior team.#TeamIndia will be disappointed with their performance.
As I had mentioned the first 10 overs will be crucial & 🇮🇳 lost both Kohli & Pujara in the space of 10 balls & that put a lot of pressure on the team. pic.twitter.com/YVwnRGJXXr
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 23, 2021
साऊथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या ऐतिहासिक सामन्यावर हवामानाचा जोर ओसरला. पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पावसात पूर्णपणे रद्द करण्यात आला. त्यामुळे राखीव दिवस हा सामन्याच्या निकालासाठी वापरावा लागला. आयसीसीने या सामन्यासाठी २३ जून राखीव दिवस ठेवला होता. यादिवशी भारतीय संघाने २ गडी बाद असताना ६४ धावांच्या पुढे (दुसरा डाव) खेळण्यास सुरुवात केली आणि १७० धावांवर पूर्ण भारतीय संघ बाद झाला. तत्पुर्वी न्यूझीलंडने पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेतल्याने त्यांना केवळ १३९ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी दोन गडी गमावून सहजपणे हे लक्ष्य पूर्ण केले व जागतिक कसोटी अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.
न्यूझीलंड संघाकडून केन विलियम्सन व रॉस टेलर हे दोघेही शेवटपर्यंत नाबाद खेळले. सामनावीर म्हणून न्यूझीलंडच्या काईल जेमिसनला निवडण्यात आले. भारतीय संघातील एकही खेळाडूला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. तर न्यूझीलंड संघात पहिल्या डावात डेवोन कॉनवे तर दुसऱ्या डावात विलियम्सनने अर्धशतक झळकावले
महत्वाच्या बातम्या
‘दादा’चे नव्या क्षेत्रातील पदार्पण टीम इंडियासाठी ठरलंय अनलकी, गमावल्यात ‘या’ २ महत्त्वाच्या स्पर्धा
कसोटी चँपियनशीप पराभवानंतरही कर्णधार विराट म्हणतोय, ‘माझ्या हा निर्णय योग्यचं होता’
‘विलियम्सन आणि कंपनी’ची कसोटी जेतेपदावर मोहोर, चॅम्पियन कर्णधाराने दिली पहिली प्रतिक्रिया