---Advertisement---

काय सांगता! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर झोपेत चालायचा!

On: सोमवार, एप्रिल 27, 2020 5:21 PM
---Advertisement---

भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला झोपेत चालण्याची सवय आहे. याबद्दल खुद्द सचिननेच त्याचा संघसहकारी आणि भारताचा महान कर्णधार सौरव गांगुलीला सांगितले होते.

याबद्दलची ही आठवण गांगुलीने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या चॅट शोमध्ये पाठीमागे सांगितली होती. गांगुली म्हणाला होता की, “माझ्या भारतीय संघातील सुरुवातीच्या दिवसात आम्ही इंग्लंड दौऱ्यावर होतो. त्यावेळी सचिन माझा रुममेट होता.

“यावेळी मी त्याला एका रात्री रुममध्ये चालताना पाहिले. तेव्हा मला वाटले की कदाचीत तो वॉशरुमला जाऊन आला असेल. त्यामुळे मी झोपलो आणि याबद्दल त्याला दुसऱ्या दिवशी काही विचारले नाही.”

“पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच घडले. तो रुममध्ये गोल-गोल फिरुन खुर्चीवर बसायचा आणि नंतर बाजूला येऊन झोपायचा. त्यावेळी मी त्याला म्हटलो की रात्री तू काय करतो असे करुन तू मला घाबरवत आहेस. पण यावर उत्तर देताना सचिनने सांगितले की त्याला झोपेत चालण्याची सवय आहे.”

याबरोबरच गांगुलीने सचिनबरोबरच्या अनेक आठवणींना उजाळा दिला होता. हे दोघेही १४ वर्षांचे असल्यापासून मित्र असल्याचेही गांगुलीने या शोमध्ये सांगितले होते.

अन्य वाचनीय लेख- 

 असा आहे विश्वचषकात विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या ट्राॅफीचा इतिहास

 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चा झालेली ती शुन्य धावेची खेळी

 खेल भी जितिये, दिल भी जितिये- अटल बिहारी वाजपेयींनी दिला होता टीम…

 …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment