---Advertisement---

या कारणामुळे मास्टर ब्लास्टर साजरा करणार नाही वाढदिवस

On: गुरूवार, एप्रिल 23, 2020 6:54 PM
---Advertisement---

भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा उद्या ४७वा वाढदिवस आहे. दरवर्षी सचिन त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. परंतु, यंदा मात्र त्याने निर्णय घेतला आहे की, तो त्याचा वाढदिवस साजरा करणार नाही.

संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरस (Corona Virus) या महामरीचा सामना करत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९शी लढणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ त्याने हा निर्णय घेतला आहे. सचिनने उचलले हे पाऊल अत्यंत प्रशंसनीय आहे.

सचिनच्या (Sachin Tendulkar) जवळच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “सचिनने त्याचा वाढदिवस न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला असे वाटते की, या व्हायरसशी लढा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, पॅरा मेडिकल स्टाफ, पोलीस, डिफेंस पर्सनल यांचा सन्मान करण्याचा हा चांगला मार्ग आहे. तसेच सचिन याविषयी बोलण्यासाठी तो नेहमी अस्वस्थ होता.”

सचिनचे चाहते सोशल मीडियाद्वारे त्याचे अभिनंदन करत आहेत. काही दिवसांपुर्वीच सचिनने पीएम केयर्स फंडमध्ये ५० लाख रुपये दान दिले होते.

सचिनने भारताकडून २०० कसोटी सामने, ४६३ वनडे सामने आणि केवळ १ आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला आहे. यामध्ये त्याने कसोटीत ५३.७८ च्या सरासरीेने १५९२१ धावा केल्या आहेत. त्यात ५१ शतक आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे.

वनडेत त्याने ४४.८३ च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहेत. यामध्ये ४९ शतक आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी२०त त्याने केवळ १० धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-षटकार- चौकार मारले म्हणून एमएस धोनी झाला होता नाराज

-भारतीय खेळाडू देशासाठी नाही तर स्वत: साठी खेळतात

-टाॅप बातम्या: ५ अशा बातम्या ज्यांची क्रिकेटवर्तुळात आज आहे मोठी चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---