---Advertisement---

संपूर्ण कारकीर्दीत न जमलेला ‘हा’ कारनामा सचिनने केला रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये

On: सोमवार, मार्च 22, 2021 7:13 PM
sachin tendulkar road saftey world series
---Advertisement---

रविवारी (२१ मार्च ) रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या भारतीय लिजेंड्स आणि श्रीलंकन लिजेंड्स यांच्यातील अंतिम सामन्यात भारतीय लिजेंड्स संघाने १४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय लिजेंड्स संघाने पहिल्यावहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या मालिकेत भारतीय लिजेंड्स संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकरकडे होते. विक्रमांचा बादशाह असणाऱ्या सचिन तेंडुलकरने कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु संपूर्ण कारकिर्दीत त्याला एका गोष्टीपासून वंचित राहावे लागले होते. ती गोष्ट सचिनने या मालिकेत पूर्ण केली आहे.

सचिनला १९९६ विश्वचषक स्पर्धेनंतर, भारतीय वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु सचिनने केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे बीसीसीआयचा हा निर्णय अयोग्य ठरला होता. सचिनने आतापर्यंत ७३ सामन्यात भारतीय संघाच्या कर्णधार पदाची भूमिका पार पाडली होती. यात त्याला अवघ्या २३ सामन्यात विजय मिळवून देण्यात यश आले होते. तसेच त्याने २५ कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली होती. यात त्याला अवघ्या ४ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात यश आले होते.

यावरून स्पष्ट दिसून येते की, सचिन फलंदाज म्हणून श्रेष्ठ आहे. पण कर्णधार म्हणून त्याचे आकडे इतके खास नाही. अशातच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मालिकेत त्याला भारतीय संघाचे नेतृत्वपद देण्यात आले होते. त्यामुळे सचिन समोर मोठे आव्हान होते. तरी देखील सचिनने योग्य निर्णय घेत भारतीय लिजेंड्स संघाला विजेतेपद मिळवून दिले.

अंतिम सामन्यात सचिन आणि सेहवाग लवकर माघारी परतले होते. त्यानंतर युवराज आणि युसुफने मिळून संघाला १८१ धावांपर्यंत पोहचवले होते. तसेच दुसऱ्या डावात श्रीलंकन फलंदाज धावा कुटत असताना सचिनने योग्य वेळेस युसुफला गोलंदाजीसाठी आणले आणि युसूफने संघाला २ महत्वाचे गडी बाद करून दिले. हा सामना भारतीय संघाने १४ धावांनी आपल्या नावावर केला. तसेच सचिनने कर्णधार म्हणून देखील आता विजेतेपद मिळवले.

महत्वाच्या बातम्या:

भारत आणि मुंबई इंडियन्स संघात सामना झाला तर कोण जिंकणार? आकाश चोप्राने दिले उत्तर

एक शतक आणि विराटच्या निशाण्यावर तीन दिग्गजांचे विक्रम

अद्वितीय! युवराजच्या कारकिर्दीला लाभली सोनेरी किनार, उंचावली आणखी एक ट्रॉफी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---