क्रिकेट जगतावर आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहलेला ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक रेकाॅर्ड केले, काही रेकाॅर्ड्स तुटले देखील, परंतु त्याचे काही रेकाॅर्ड्स असे आहेत, जे मोडीत काढणे कोणत्याही फलंदाजासाठी अशक्य आहे. तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत वनडेमध्ये 18,426 धावा आणि कसोटीत 15,921 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर सर्व फॉरमॅटसह 100 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. तत्पूर्वी आपण त्याच्या 3 रेकाॅर्ड्सबद्दल जाणून घेऊया जे कोणत्याही फलंदाजाला मोडीत काढणे अशक्य आहे.
1) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार- सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4,076 हून अधिक चौकार मारले आहेत. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 2,016 चौकार, कसोटी कारकीर्दीत 2,058 चौकार आणि टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 2 चौकार मारले आहेत. त्याचा हा रेकाॅर्ड सध्या कोणताही फलंदाज तोडताना दिसत नाही. सक्रिय फलंदाजांपैकी विराट कोहलीने (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2,654 चौकार मारले आहेत.
2) सर्वाधिक एकदिवसीय सामने- सचिन तेंडुलकरने आपल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सर्वाधिक 463 सामने खेळण्याचा रेकाॅर्ड केला आहे. त्याचा हा महान रेकाॅर्ड आजपर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला मोडता आला नाही. याशिवाय सध्याचा कोणताही फलंदाज त्याचा हा रेकाॅर्ड मोडेल असे वाटत नाही. तेंडुलकरने त्याचा पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना (18 डिसेंबर 1989) रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला, तर शेवटचा एकदिवसीय सामना (18 मार्च 2012) रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला.
3) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा- सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34,357 धावा केल्या असून त्याचा रेकाॅर्ड मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी अशक्य आहे. त्याच्या जवळपासही कोणता फलंदाज नाही. तेंडुलकरनंतर श्रीलंकेच्या कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,016 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत पंत करणार पुनरागमन, मोठे अपडेट समोर
उडता रिषभ पंत! यष्टीमागे हवेत झेप घेत अगदी अलगद पकडला चेंडू, व्हिडिओ व्हायरल
अश्विनसारखी गोलंदाजी शैली असलेल्या फिरकीपटूला बीसीसीआयनं धाडलं बोलावणं, कोण आहे तो?