भारतीय संघाला 2011 साली विश्वचषक विजेता बनवणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी मोठा खुलासा केला. भारतीय संघाला आजपर्यंत अनेक प्रशिक्षक मिळाले. यातील काही प्रशिक्षक खूप यशस्वी राहिले, तर काहीचा कार्यकाळ विवादाचा राहिला. दक्षिण आफ्रिका संघाचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन यांचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळ मात्र सर्वोत्तम मानला जातो. कर्स्टन यांच्या मार्गदर्शनात संघाने विश्वचषक जिंकला असला, तरी सचिन तेंडुलकर मात्र त्यांच्यावर निराश होता, असा खुलासा कर्स्टनने स्वतः केला आहे.
भारतीय संघाने 2011 साली वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला मात देत विजेतेपद जिंकले होते. विश्वचषक विजेत्या संघात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) देखील सामील होता आणि हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे विश्वचषक देखील जिंकला. भारतीय संघाने सचिनचा शेवटचा विश्वचषक असल्यामुळे पूर्ण प्रयत्न केले आणि विजेतेपद पटकावले. त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) होते आणि त्यांचे संघासाठीचे योगदान महत्वपूर्ण राहिले. असे असले तरी, कर्स्टन संघाशी जोडले गेल्यानंतर मात्र सचिन चांगलाच निराश होता.
वेस्ट इंडीजमध्ये 2007 सालचा विश्वचषक खेळला गेला होता. या विश्वचषकात भारताचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले होते. भारताने श्रीलंका आणि बांगलादेश संघांविरुद्ध पराभव स्वीकारला होता आणि संघ या स्पर्धेतून बाहेर पडला हतो. गॅरी कर्स्टन यांनी याचविषयी एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. ऍडम कॉलिन्ससोबत त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना कर्स्टन यांनी सचिनविषयी हा खुलासा केला. कर्स्टनने सांगितल्यानुसार जेव्हा 2007 मध्ये ते भारतीय संघात सामील झाले, तेव्हा सचिनसह संघातील काही खेळाडून खुश नव्हते.
“संघाला कशा प्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे, ही बाब माझ्यासाठी सर्वात महत्वाची होती, जे नेतृत्वा या गुणवंत शंघाला विश्वविजेता बनवू शकेल. कोणत्याही प्रशिक्षकासाठी हे मोठे आव्हान असते. जेव्हा मी कार्यभार सांभाळला, तेव्हा संघात नक्कीच भीतीचे वातावरण होते. खुप सारे लोक खुश नव्हते आणि याच कारणास्तव प्रत्येकाला समजून घेणे खूप अवघड होते. जेव्हा मी संघ जॉइन केला, तेव्हा सचिन जराही खुश नव्हता. सचिनला त्यावेळी वाटायचे की तो खूप योगदान देऊ शकतो, पण त्यावेळी तो क्रिकेटचा आनंद घेत नव्हता (फॉर्ममध्ये नव्हता). त्यावेळी सचिन निवृत्ती घेण्याचा विचारही करत होता. जाऊन त्याच्याशी बोलणे माझ्यासाठी महत्वाचे होते. त्याच्याशी चर्चा करून तो भारतासाठी अजूनही खूप काही करू शकतो, हे समजावून सांगणे माझ्यासाठी महत्वाचे होते.” (‘Sachin Tendulkar was not happy after I joined the team…’, claims former coach Gary Kirsten)
हास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला ‘हा’ भारतीय खेळाडू, जसप्रीत बुमराहचा निर्णयही झाला
‘वॅलेंटाईन्सन डे’ची वेळ साधून पृथ्वी शॉकडून गर्लफ्रेंडच्या नात्यावर शिक्कामोर्तब, लिहिले…