श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटटपटू सचित्रा सेनानायके याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सचित्राला सोमवारी स्थानिक न्यायलयाने विदेश यात्र करण्यावर बंदी घातली आहे. हा माजी श्रीलंकन फिरकीपटू मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकल्याचे दिसते. याविषयी त्याच्यावर आरोप केले गेले आहेत, ज्यामुळे न्यायलयाने ही कारकवाई केली.
कोलंबोच्या मुख्य दंडाधिकारी न्यायलयाने सचित्र सेनानायके (Sachithra Senanayake) याच्यावर ही कारवाई केली आहे. न्यायलयाच्या आदेशामुळे येत्या तीन महिन्यांसाठी सचित्रला विदेश दौरा करता येणार नाहीये. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर फिरकीपटूने श्रीलंकन संघासाठी 1 कसोटी, 49 वनडे आणि 24 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण वनडे क्रिकेटमध्ये 53 तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत.
लंका प्रीमियर लीगच्या 2020 हंगामात सचित्र सेनानाये याने मॅच फिक्स केली होती, असा आरोप फिरकीपटू गोलंदाजावर केला गेला आहे. त्याने खेळाडूंना फोन करून मॅच फिक्स करण्यासाठी प्रस्ताव दिला होता, असे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी, 2014 मध्ये सचित्रावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही बंदी आली होती. आक्षेपार्ह गोलंदाजी ऍक्शनमुळे काही काळासाठी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी घातली गेली होती. नोव्हेंबर 2014 मध्ये त्याने आपल्या ऍक्शनमध्ये सुधार करून संघात पुनरागमन केले. जानेवारी 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर कारकिर्दीतील शेवटचा सामना त्याने 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला. (Sachithra Senanayake has been banned from traveling outside Sri Lanka )
महत्वाच्या बातम्या –
कोच राहुल द्रविडचे दिलासादायक वक्तव्य, राहुल आणि श्रेयसच्या कमबॅकचे दिले संकेत
INDvsWI: ‘आता कारणं देऊ नका’, भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने साधला निशाणा