---Advertisement---

दु:खद बातमी.! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे 74 व्या वर्षी निधन

---Advertisement---

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेले संझगिरी मुंबई महानगरपालिकेत एका उच्च पदावर कार्यरत होते. पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातील त्यांच्या आवडीमुळे ते क्रिकेट समीक्षक बनले. मराठी क्रिकेट प्रेमींनी नेहमीच त्यांच्या क्रिकेटवरील लेखांचे काैतुक केले. क्रिकेट या खेळाबाबतची माहिती देणारा, त्यातली सौंदर्यस्थळं लेखणीने टिपणारा एक अवलिया माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्व हळहळ व्यक्त करत आहे.

द्वारकानाथ सांझगिरी यांनी 1983 पासून सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धांचे वार्तांकन केले आहे. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी लोकप्रिय क्रिकेट समालोचक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, आमचे मित्र द्वारकानाथ संजगिरी यांच्या निधनाने त्यांना खूप दुःख झाले आहे. ते क्रिकेट प्रेमी, क्रिकेट संशोधक, क्रिकेट पारखी, क्रिकेट विश्वकोश, क्रिकेट रेकॉर्डर आणि क्रिकेटशी संबंधित घटनांचे विश्लेषक होते.

हर्षा भोगले यांनीही द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी सांगत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 38 वर्षांपासून माझा मित्र असणारा माणूस आज जग सोडून गेला आहे. त्याच्या लिखाणाचे स्मरण कायम लक्षात राहिल. माझा मित्र द्वारकानाथ ज्या गोष्टींची कल्पना करायचा तेच तेच त्याच्या लिखाणात उतरायचे. माझ्या मित्राच्या कुटुंबासह माझ्या सहवेदना. अशाप्रकारे हर्षा भोगले यांनी पोस्ट केली आहे.

हेही वाचा-

IND vs ENG; इंग्लंडने जिंकला टाॅस, फलंदाजीचा निर्णय, टीम इंडियाच्या दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी
संघाला मोठा धक्का..! चॅम्पियन्स ट्राॅफीच्या तोंडावर अष्टपैलू खेळाडूने घेतली निवृत्ती
राहुल की रिषभ पंत, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असेल विकेटकीपर? रोहित म्हणाला, ‘दोघांमध्येही सामना….

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---