क्रिकेट जगतातून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. इंग्लिश क्रिकेटपटू मॅट डन याची लहान मुलगी फ्लोरेंस हिने जगाचा निरोप घेतला. तिचे वय अवघे दोन वर्ष होते. फ्लोरेंसच्या आई वडिलांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट शेअर करत मुलीच्या निधानाची दुःखद बातमी दिली. फ्लोरेंसला फिट म्हणजेच अपस्मारचा (Epilepsy) आजार होता.
इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून फ्लोरेंसच्या आई वडिलांनी लिहिले की, “आमची मुलगी या लढाईत पराभूत झाली आणि तिला सुंदर पंख प्राप्त झाले. या दुःखद प्रसंगी शब्द शोधने कठीण आहे. तू आमच्यावर खूप प्रेम करत होती आणि एवढ्या सगळ्यांवर जी झाप तू सोडलीस, ती पाहण्यासारखीच आहे. ज्या-ज्या खोलीत तू प्रवेश केला, त्याठिकाणी प्रकाश पसरवला. आम्हाला तुझा नेहमी अभिमान असेल.”
https://www.instagram.com/p/CpzSgcZIt2-/?utm_source=ig_web_copy_link
सरे क्रिकेट संघासाटी देशांतर्गत क्रिकेट केळणारा मॅट डन (Matt Dunn) याने आपल्या इंस्टाग्रान स्टोरीला देखील फ्लोरेंसचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “तू नेहमी माझ्या मनात राहशील.” संघातील खेळाडूच्या दुःखात सरे संघ देखील सामील झाला. सरेचे संघाचे डायरेक्टर म्हणाले की, “फ्लेरंसच्या निधनाची वार्ता ऐकून आम्ही सर्वजण खूपच निराश झालो. आमच्या सदिच्छा संपूर्ण डन कुटुंबियांसोबत आहेत. मॅट डन आणि जेसिकाला आम्ही सर्व मदत पुरवू, जी त्यांना हवी आहे.”
Everyone at Surrey is greatly saddened by the news of the passing of Matt Dunn’s daughter Florence.
Our thoughts are with Matt and his wife Jessica, who bravely managed Florence’s Dravet Syndrome – a severe form of epilepsy. pic.twitter.com/p4eL4OJfjn
— Surrey Cricket (@surreycricket) March 16, 2023
दरम्यान, मॅट डनच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर त्याला अद्याप इंग्लंडसाठी पदार्पणाची संधी मिळाली नाहीये. पण तिने इंग्लंडच्या 19 वर्षांखालील आणि इंग्लंड लायन्स संघासाठी खेळला आहे. वेगवान गोलंदाज मॅठने 2010 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 43 सामन्यांमध्ये 36.21च्या सरासरीने 117 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने मागच्या 11 वर्षांमध्ये 18 लिस्ट ए आणि 23 टी-20 सामने खेळले.
(Sad news: English cricketer’s toddler dies)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
त्यामुळे धोनी 41व्या वर्षीही फिट! 20 वर्षांपूर्वी घ्यायचा ‘हा’ डायच, रॉबिन उथप्पाचा खुलासा
दुसऱ्या वनडेत पाऊस ठरणार विलन? जाणून घ्या कसे असणार विशाखापट्टणमचे वातावरण