---Advertisement---

दु:खद! भारतात आलेल्या ‘या’ पाकिस्तानी खेळाडूच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, कुटुंब शोकसागरात

On: रविवार, ऑक्टोबर 1, 2023 3:33 PM
Shadab-Khan
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात पोहोचला आहे. भारतीयांनी केलेले स्वागत पाहून पाकिस्तानी खेळाडू खूपच खुश आहेत.  मात्र, अशातच एक दु:खद बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेसाठी भारतात आलेला पाकिस्तानी खेळाडू शादाब खान (Shadab Khan) याच्या आत्याचे शनिवारी (दि. 30 सप्टेंबर) निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंब शोकसागरात आहे.

शादाबने दिली माहिती
शादाब खान याच्या आत्याने जगाचा निरोप घेतला आहे. याची माहिती इतर कुणी नाही, तर स्वत: शादाब खान याने दिली आहे. त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर (एक्स) अकाऊंटवरून ट्वीट करत लिहिले की, “आताच मी माझ्या आत्याच्या निधनाचे वृत्त ऐकले आहे. कृपया तुमच्या प्रार्थनांमध्ये त्यांची आठवण ठेवा.”

चाहत्यांची प्रार्थना
शादाबच्या आत्याच्या निधनामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून शादाबचे चाहतेही त्याच्या आत्यासाठी प्रार्थना करत आहेत. इतकेच नाही, तर पाकिस्तानी क्रिकेट संघाचे चाहतेही शादाबच्या आत्याच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

पाकिस्तानचा सामना
पाकिस्तान संघाच्या अलीकडील प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर अलीकडेच संघ आशिया चषक 2023 स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेत पाकिस्तान संघाला वाईटरीत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच, आता वनडे विश्वचषक 2023साठी पाकिस्तान संघ तयार झाला आहे.

पाकिस्तान संघ विश्वचषकातील आपला पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. या सामन्यात पाकिस्तानपुढे नेदरलँड संघाचे आव्हान असणार आहे. हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. अशात या सामन्यापूर्वी पाकिस्तान आणि नेदरलँड संघ तयारीला लागला आहे. (sad news shadab khans Aunt passed away)

हेही वाचा-
विश्वचषक 2011मध्ये सचिनने दिलेला ‘विमानतळावर हेडफोन घालण्याचा’ सल्ला, युवराजचा खुलासा
इतिहास ODI World Cupमधील पहिल्या सामन्यांचा, वाचा सर्वाधिक वेळा कुणाच्या पदरी पडलाय विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---